श्रीहरिकोटा
श्रीहरिकोटा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील द्वीप आहे. हे चेन्नई पासून अंदाजे ८० किमी अंतरावर आहे. भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र, सतीश धवन अंतराळ केंद्र येथे आहे. इस्रो ही संस्था येथून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान इत्यादिंचे प्रक्षेपण करते.