Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२
भारत
श्रीलंका
तारीख२४ फेब्रुवारी – १६ मार्च २०२२
संघनायकरोहित शर्मादिमुथ करुणारत्ने (कसोटी)
दासून शनाका (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावारविंद्र जडेजा (२०१) दिमुथ करुणारत्ने (१६६)
सर्वाधिक बळीरविचंद्रन अश्विन (१२‌) लसिथ एम्बलडेनिया (८)
मालिकावीरऋषभ पंत (भारत)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाश्रेयस अय्यर (२०४) दासून शनाका (१२४)
सर्वाधिक बळीभुवनेश्वर कुमार (३) लाहिरु कुमार (५)
मालिकावीरश्रेयस अय्यर (भारत)

श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले. जानेवारी मध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी२० मालिका कसोटी मालिकेपूर्वी खेळवण्यात यावी अशी विनंती बीसीसीआयकडे केली. त्यानुसार बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जारी केले ज्यात ट्वेंटी२० मालिका फेब्रुवारीपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले. बंगळूर येथील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र खेळवण्यात आली.

भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली. पहिल्या कसोटीसाठी ५०% प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली. मोहाली येथील पहिला कसोटी सामना हा विराट कोहलीचा १००वा कसोटी सामना होता. रविंद्र जडेजा याच्या नाबाद १७५ धावांच्या आणि ९ गडी मिळवून केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने पहिला कसोटी सामना १ डाव आणि २२२ धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली. बंगळूर येथील दुसरी कसोटीत २३८ धावांनी विजय मिळवत भारताने कसोटी मालिका २-० ने जिंकली. दौऱ्यानंतर श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज सुरंगा लकमल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२४ फेब्रुवारी २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९९/२ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३७/६ (२० षटके)
ईशान किशन ८९ (५६)
दासून शनाका १/१९ (२ षटके)
भारत ६२ धावांनी विजयी.
इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, लखनौ
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: ईशान किशन (भारत)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • दीपक हूडा (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

२६ फेब्रुवारी २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८३/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८६/३ (१७.१ षटके)
श्रेयस अय्यर ७४* (४४)
लाहिरु कुमार २/३१ (३ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: श्रेयस अय्यर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

२७ फेब्रुवारी २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४६/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४८/४ (१६.५ षटके)
दासून शनाका ७४* (३८)
अवेश खान २/२३ (४ षटके)
श्रेयस अय्यर ७३* (४५)
लाहिरु कुमार २/३९ (३.५ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: श्रेयस अय्यर (भारत)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.


१ली कसोटी

भारत Flag of भारत
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५७४/८घो (१२९.२ षटके)
रविंद्र जडेजा १७५* (२२८)
सुरंगा लकमल २/९० (२५ षटके)
१७४ (६५ षटके)
पथुम निसंका ६१* (१३३)
रविंद्र जडेजा ५/४१ (१३ षटके)‌
१७८ (६० षटके)(फॉ/ऑ)
निरोशन डिक्वेल्ला ५१* (८१)
रविंद्र जडेजा ४/४६ (१६ षटके)‌
भारत १ डाव आणि २२२ धावांनी विजयी.
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: नितीन मेनन (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: रविंद्र जडेजा (भारत)


२री कसोटी

१२-१६ मार्च २०२२ (दि/रा)
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
भारत Flag of भारत
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२५२ (५९.१ षटके)
श्रेयस अय्यर ९२ (९८)
प्रवीण जयविक्रमा ३/८१ (१७.१ षटके)
१०९ (३५.५ षटके‌)
अँजेलो मॅथ्यूज ४३ (८५)
जसप्रीत बुमराह ५/२४ (१० षटके)
३०३/९घो (६८.५ षटके)
श्रेयस अय्यर ६७ (८७)
प्रवीण जयविक्रमा ४/७८ (१९ षटके)
२०८ (५९.३ षटके)
दिमुथ करुणारत्ने १०७ (१७४)
रविचंद्रन अश्विन ४/५५ (१९.३ षटके)
भारत २३८ धावांनी विजयी.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: श्रेयस अय्यर (भारत‌)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • भारत आणि श्रीलंकेमधील पहिला वहिला दिवस/रात्र कसोटी सामना.
  • सुरंगा लकमल (श्री) याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - १२, श्रीलंका - ०.



श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२०