श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००५ | |||||
श्रीलंका | भारत | ||||
तारीख | २२ ऑक्टोबर – २२ डिसेंबर २००५ | ||||
संघनायक | मार्वन अटापट्टु | राहुल द्रविड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | महेला जयवर्धने (२५५) | इरफान पठाण (२०२) | |||
सर्वाधिक बळी | मुथय्या मुरलीधरन (१६) | अनिल कुंबळे (२०) | |||
मालिकावीर | अनिल कुंबळे (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ७-सामन्यांची मालिका ६–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कुमार संघकारा (२९६) | महेंद्रसिंग धोणी (३४६) | |||
सर्वाधिक बळी | मुथय्या मुरलीधरन (६) | अजित आगरकर (१२) | |||
मालिकावीर | महेंद्रसिंग धोणी (भा) |
ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौरा दोन भागात विभागला गेला होता कारण एकदिवसीय मालिका (२५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर) आणि डिसेंबरमधील कसोटी मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला होता. एकदिवसीय मालिकेआधी भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सातव्या स्थानी होता, आणि श्रीलंकेचा संघ दुसऱ्या. त्याशिवाय भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुलीकडून औपचारिकरित्या राहुल द्रविडकडे देण्यात आले होते. भारतीय संघाने पहिले चार एकदिवसीय सामन्यांसह मालिकेत ६-१ असा विजय मिळवला. पहिल्या सहा एकदिवसीय सामन्यांत फक्त ८६ धावा करू शकलेल्या, सनत जयसुर्याला श्रीलंकेच्या कसोटी संघातून वगळण्यात आले.[१]. एकदिवसीय सामन्यांमध्ये २ वेळा नाबाद राहुन ३१२ धावा केल्या नंतर एकदिवसीय क्रमवारीत राहुल द्रविड १८ स्थाने वर चढला[२] भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोणीची कामगिरीसुद्धा लक्षणीय झाली, मालिकेत त्याची सरासरी दुसरी सर्वात जास्त होती. एका सामन्यानत त्याने नाबाद १८३ धावा केल्या, जी त्यावेळी एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी सर्वोच्च धावसंख्या होती.
कसोटी मालिकासुद्धा भारताने २-० अशी जिंकली, ज्यापैकी पहिल्या कसोटी मालिकेत पावसामुळे फक्त साडेतीन दिवसांचा खेळ शक्य झाला होता. दुसऱ्या कसोटीत अनिल कुंबळेने ७२ धावांत ६ गडी बाद केल्याने, भारताला ६० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ४ फलंदाजांनी केलेल्या अर्धशतकांच्या (इरफान पठाण (९३), युवराज सिंग (७७), राहुल द्रविड (५३) आणि महेंद्रसिंग धोणी (५१*)) जोरावर भारताला ३७५ धावांवर डाव घोषित करता आला. त्यानंतर कुंबळेने सामन्यात १० बळी पूर्ण केले आणि श्रीलंकेचा संघ २४७ धावांवर बाद होऊन १८८ धावांनी पराभूत झाला. तिसऱ्या कसोटीतील विजय आणखी ठोस होता, कुंबळेने ७ आणि हरभजन सिंगने १० बळी घेऊन श्रीलंकेचा डाव २०६ आणि २४९ धावांवर संपवण्यास हातभार लावला आणि श्रीलंका २५९ धावांनी पराभूत झाली.
संघ
- श्रीलंका एकदिवसीय संघ: मार्वन अटापट्टु (कर्णधार), कुमार संघकारा (यष्टिरक्षक), रसेल आर्नॉल्ड, उपुल चंदना, तिलकरत्ने दिलशान, दिल्हारा फर्नांडो, सनत जयसुर्या, महेला जयवर्धने, दिलहारा लोकुहेत्तीगे, फरवीझ महारूफ, मुथय्या मुरलीधरन, तिलन समरवीरा, उपुल तरंगा, चमिंडा वास, नुवान झोयसा.
- भारत एकदिवसीय संघ: राहुल द्रविड (कर्णधार), महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक), अजित आगरकर, गौतम गंभीर, हरभजन सिंग, मुरली कार्तिक, इरफान पठाण, सुरेश रैना, विरेंद्र सेहवाग, रुद्र प्रताप सिंग, श्रीसंत, सचिन तेंडुलकर, वेणुगोपाल राव, जय प्रकाश यादव, युवराज सिंग.
- सहाव्या आणि सातव्या सामन्यात वेणुगोपाल राव आणि जयप्रकाश यादव यांच्याऐवजी मोहम्मद कैफ आणि विक्रम राज वीर सिंग यांची निवड करण्यात आली, परंतु सिंग क्षमता चाचणीत नापास झाल्याने यादवला पुन्हा निवडण्यात आले.[३]
- श्रीलंका कसोटी संघ: मार्वन अटापट्टु (कर्णधार), कुमार संघकारा (यष्टिरक्षक), मलिंगा बंडारा, तिलकरत्ने दिलशान, दिल्हारा फर्नांडो, अविष्का गुणवर्धने, महेला जयवर्धने, फरवीझ महारूफ, लसित मलिंगा, जेहान मुबारक, मुथय्या मुरलीधरन, तिलन समरवीरा, उपुल तरंगा, चमिंडा वास, सजीवा वीराकून.
- चामर कपुगेडेराची कसोटी संघात निवड झाली होती परंतु दुखापतीमुळे मुबारकची संघात निवड करण्यात आली[४]
- भारत कसोटी संघ: राहुल द्रविड (कर्णधार), महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक), अजित आगरकर, गौतम गंभीर, सौरव गांगुली, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, मुरली कार्तिक, अनिल कुंबळे, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, इरफान पठाण, विरेंद्र सेहवाग, रुद्र प्रताप सिंग, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग
- तिसऱ्या कसोटीमध्ये गांगुलीच्या ऐवजी वसिम जाफरची निवड करण्यात आली. [५]
दौरा सामने
५०-षटके: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. श्रीलंकन्स
२२ ऑक्टोबर धावफलक |
श्रीलंका २६७/९ (५० षटके) | वि | मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI २६८/७ (४९.५ षटके) |
विनायक माने ७५ (११०) नुवान झोयसा २/४१ (९ षटके) |
- नाणेफेक : मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI, गोलंदाजी
प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. श्रीलंकन्स
२६–२८ नोव्हेंबर धावफलक |
भारतीय अध्यक्षीय XI | वि | श्रीलंका |
- नाणेफेक: श्रीलंकन्स, गोलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही आणि दुसऱ्या दिवशी १३:३० वाजता खेळ सुरू झाला.
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
भारत ३५०/६ (५० षटके) | वि | श्रीलंका १९८ (३५.४ षटके) |
कुमार संघकारा ४३ (३७) हरभजन सिंग ३/३५ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: श्रीसंत (भा).
२रा एकदिवसीय सामना
श्रीलंका १२२ (३५.४ षटके) | वि | भारत १२३/२ (२०.२ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
३रा एकदिवसीय सामना
३१ ऑक्टोबर धावफलक |
श्रीलंका २९८/४ (५० षटके) | वि | भारत ३०३/४ (४६.१ षटके) |
महेंद्रसिंग धोणी १८३* (१४५) मुथय्या मुरलीधरन २/४६ (१० षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
४था एकदिवसीय सामना
श्रीलंका २६१ (४९.५ षटके) | वि | भारत २६२/६ (४५.४ षटके) |
राहुल द्रविड ६३ (७२) मुथय्या मुरलीधरन ३/३५ (९ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
५वा एकदिवसीय सामना
भारत २८५/८ (५० षटके) | वि | श्रीलंका २८६/५ (४७.४ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
६वा एकदिवसीय सामना
श्रीलंका १९६ (४२.५ षटके) | वि | भारत १९७/३ (३४.५ षटके) |
युवराज सिंग ७९* (६७) दिल्हारा फर्नांडो २/५८ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
७वा एकदिवसीय सामना
श्रीलंका २४४/९ (५० षटके) | वि | भारत २४५/५ (३९.३ षटके) |
रसेल आर्नॉल्ड ६८ (६९) रुद्र प्रताप सिंग ३/३३ (१० षटके) | महेंद्रसिंग धोणी ८० (७३) नुवान झोयसा २/४७ (७ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२-६ डिसेंबर धावफलक |
भारत | वि | श्रीलंका |
१६८/४ (४३ षटके) महेला जयवर्धने ७१ (८०) | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- पावसामुळे १ल्या, २ऱ्या आणि ३ऱ्या दिवशी खेळ उशीरा सुरू झाला.
- कसोटी पदार्पण: महेंद्रसिंग धोणी (भा).
२री कसोटी
३री कसोटी
बाह्यदुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ जयसुर्याला वगळले क्रिकइन्फो, २८ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
- ^ श्रीलंकेचा भारत दौरा, २००५-०६ एकदिवसीय मालिकेचील सरासरी क्रिकइन्फो
- ^ दुखापतग्रस्त विक्रम राज वीर सिंगऐवजी यादव पुन्हा संघात क्रिकइन्फो, ८ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
- ^ श्रीलंकाच्या संघात जेहान मुबारकची निवड क्रिकइन्फो, २९ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
- ^ गांगुलीला तिसर्या कसोटीतून वगळले क्रिकइन्फो, १४ डिसेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२० |
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६