श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८
श्रीलंका वि पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१७–१८ | |||||
पाकिस्तान | श्रीलंका | ||||
तारीख | २८ सप्टेंबर – २९ ऑक्टोबर २०१७ | ||||
संघनायक | सरफराज अहमद | दिनेश चंदिमल (कसोटी) उपुल तरंगा (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | असद शफिक (१८३) | दिमुथ करुणारत्ने (३०६) | |||
सर्वाधिक बळी | यासिर शाह (१६) | रंगना हेराथ (१६) | |||
मालिकावीर | दिमुथ करुणारत्ने (श्री) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बाबर आझम (३०३) | उपुल तरंगा (१९९) | |||
सर्वाधिक बळी | हसन अली (१४) | लाहिरू गमागे (७) | |||
मालिकावीर | हसन अली (पा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शोएब मलिक (१०२) | दनुष्का गुणतिलक (७८) | |||
सर्वाधिक बळी | फहीम अश्रफ (६) हसन अली (६) | विकुम संजय (४) |
श्रीलंका क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी२० सामन्यांसाठी संयुक्त अरब अमिरातचा दौरा केला.[१][२] ह्यामध्ये मिसबाह-उल-हकच्या निवृत्तीनंतर पाकिस्तानच्या सरफराज अहमद यांने पहिल्यांदाच कर्णधार असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा समावेश होता.[३]
२७ सप्टेंबर २०१७ रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी पंचांची निवड केली.[४] दुसरा कसोटी सामना दिवसा / रात्र खेळवला गेला, तो श्रीलंकेसाठी पहिलाच दिवस / रात्र कसोटी सामना होता.[५] श्रीलंकेने कसोटी मालिका २–० ने जिंकली. पाकिस्तानचा हा ऑक्टोबर २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ३-० व्हाईटवॉश नंत पाकिस्तानचा हा घरच्या मालिकेतील दुसरा तर संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलाच व्हाईटवॉश.[६] पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली.[७] एकाच वर्षात तीन एकदिवसीय मालिकांमध्ये ५-० असा व्हाईटवॉश मिळणारा श्रीलंका हा पहिलाच संघ. ह्या आधी त्यांना जानेवारी मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून तर ऑगस्टमध्ये भारताकडून व्हाईटवॉश मिळाला होता.[८]
पाकिस्तानमध्ये पुनरागमन
ऑगस्ट २०१७ मध्ये, श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष थिलंगा सुमथिपला म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन टी२० सामन्यांपैकी एक पाकिस्तानातील लाहोर येथे खेळायला आवडेल.[९][१०][११] मार्च २००९ मध्ये, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमकडे जात असताना असताना श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर, केवळ झिम्बाब्वेने मे २०१५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.[९] २००९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात श्रीलंकेच्या सध्याच्या संघातील, चामर कपुगेडेरा आणि सुरंगा लकमल हे दोघे त्यावेळी बसमध्ये होते आणि या मालिकेसाठीसुद्धा ह्या दोघांची निवड टी२० संघात होण्याची शक्यता आहे.[१२]
सप्टेंबर २०१७ मध्ये, सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले, ज्यामध्ये टी२० मालिकेतील लाहोरमध्ये होणाऱ्या शेवटच्या सामन्याचा समावेश होता. [१३] श्रीलंका क्रिकेटने म्हणले की, लाहोरमधील क्रिकेट सामना खेळण्यासाठी "कंत्राटी बंधन" आहे, परंतु पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या कोणत्याही खेळाडूला दंड होणार नाही. [१२] तथापि, १४ ऑक्टोबर २०१७ रोजी, श्रीलंकेच्या संघाने सदर सामना तटस्थ ठिकाणी हलविला जाण्याची विनंती करून, पाकिस्तानला जाण्याची आपली अनिच्छा व्यक्त केली. [१४] १६ ऑक्टोबर २०१७ रोजी, श्रीलंका क्रिकेटने जाहीर केले की, लाहोरमध्ये खेळलेला जाणारा सामना ठरल्याप्रमाणेच होईल, परंतु त्यांचा मर्यादित षटकांमधील कर्णधार उपुल तरंगा यांने सामन्यातून माघार घेतली. [१५] खेळाडूंना सामन्याबद्दल चिंता वाटत असतानाही, संघाचे व्यवस्थापक असांका गुरूसिंघे यांना वाटले की, या सामन्यासाठी एक स्पर्धात्मक संघच निवडला जाईल. [१६] १९ ऑक्टोबर, २०१७ रोजी श्रीलंकेचे मुख्य निवडणूक अधिकारी ग्रॅहम लेब्रोय म्हणाले की, लाहोरला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडूंची इतर दोन टी२० सामन्यांसाठी निवड होण्याची शक्यता नाही.[१७] त्यानंतर दोनच दिवसांनी टी२० संघ जाहीर कण्यात आला, त्यासाठी थिसारा परेराला कर्णधार म्हणून निवडले गेले.[१८]
श्रीलंकेचा संघाचे "असाधारण" सुरक्षेमध्ये लाहोर येथे आगमन झाले आणि बॉम्ब-प्रूफ बसमधू ते संघाच्या हॉटेलकडे रवाना झाले. .[१९] लाहोर ट्वेन्टी२० आधी, श्रीलंका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष थिलंगा सुमथिपला म्हणाले की, पाकिस्तानचा दौरा संघासाठी विशेष आहे आणि ह्यामुळे भविष्यात देशाला इतर दौऱ्यांच्या आयोजनासाठी मदतच होईल. [२०] पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, हा सामना म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट देशात पुन्हा येण्याची सुरुवात आहे, तसेच त्यांना आशा वाटली की २०२० च्या अखेरीपर्यंत सर्व देश पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळतील. [२१] पाकिस्तानने टी२० मालिका ३-० ने जिंकली. [२२] सामना संपल्यानंतर एशियन क्रिकेट काउन्सिलने जाहीर केले की एसीसी एमर्जिंग संघ एशिया चषक, २०१८ पाकिस्तानमध्ये एप्रिलमध्ये खेळला जाणार असल्याचे जाहीर केले.[२३]
संघ
- एकदिवसीय मालिकेआधी, दुखापतीमुळे मोहम्मद आमिरला वगळण्यात आले आणि त्याच्या जागा उस्मान खानला मिळाली.[२९]
- दुखापतीमुळे नुवान प्रदीपच्या जागी लाहिरू गमागेला श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात स्थान मिळाले.[३०]
- तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या आधी, श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात सादीरा समरविक्रमचा समावेश करण्यात आला. was added to Sri Lanka's ODI squad.[३१]
कसोटी मालिका
१ली कसोटी
२८ सप्टेंबर–२ ऑक्टोबर २०१७ धावफलक |
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: हॅरिस सोहेल (पा).
- सरफराज अहमद हा पाकिस्तानचा ३२वा कसोटी कर्णधार.[३२]
- पंच इयान गोल्ड आजारी पडल्यामुळे त्यांच्या ऐवजी रिचर्ड केटेलबोरो यांनी पंचांचा कार्यभार वाहिला.[३३]
- यासिर शाहने (पा) त्याचा १५०वा कसोटी बळी घेतला आणि तो सर्वात जलद १५० बळी घेणारा फिरकी गोलंदाज तर एकूण संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.[३४]
- कसोटी क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारा अझर अली हा आठवा पाकिस्तानी फलंदाज.[३५]
- रंगना हेराथचे (श्री) ४०० कसोटी बळी पूर्ण आणि पाकिस्तान विरुद्ध १०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच गोलंदाज.[३६]
- अबू धाबीमध्ये पाकिस्तानचा पहिलाच कसोटी पराभव.[३७]
२री कसोटी
६–१० ऑक्टोबर २०१७ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: लाहिरू गमागे आणि सादीरा समरविक्रम (श्री).
- हा श्रीलंकेचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना.[३८]
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
पाकिस्तान २९२/६ (५० षटके) | वि | श्रीलंका २०९/८ (५० षटके) |
बाबर आझम १०३ (१३१) सुरंगा लकमल २/४७ (१० षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
२रा एकदिवसीय सामना
पाकिस्तान २१९/९ (५० षटके) | वि | श्रीलंका १८७ (४८ षटके) |
बाबर आझम १०१ (१३३) लाहिरू गमागे ४/५७ (१० षटके) |
३रा एकदिवसीय सामना
श्रीलंका २०८ (४८.२ षटके) | वि | पाकिस्तान २०९/३ (४२.३ षटके) |
उपुल तरंगा ६१ (८०) हसन अली ५/३४ (१० षटके) | इमाम-उल-हक १०० (१२५) थिसारा परेरा १/२२ (४ षटके) |
४था एकदिवसीय सामना
श्रीलंका १७३ (४३.४ षटके) | वि | पाकिस्तान १७७/३ (३९ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: उस्मान खान (पा) आणि सादीरा समरविक्रम (श्री).
५वा एकदिवसीय सामना
श्रीलंका १०३ (२६.२ षटके) | वि | पाकिस्तान १०५/१ (२०.२ षटके) |
थिसारा परेरा २५ (२९) उस्मान खान ५/३४ (७ षटके) | फखार झमान ४८ (४७) जेफ्री व्हँडर्से १/३० (६.१ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- उस्मान खानचे (पा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[४४]
टी२० मालिका
१ला टी२०
पाकिस्तान १०२ (१८.३ षटके) | वि | श्रीलंका १०३/३ (१७.२ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: सादीरा समरविक्रम (श्री).
- थिसारा परेरा (श्री) हा टी२० क्रिकेटमधील श्रीलंकेचा ९वा कर्णधार.[४५]
२रा टी२०
पाकिस्तान १२४/९ (२० षटके) | वि | श्रीलंका १२५/८ (१९.५ षटके) |
दनुष्का गुणतिलक ५१ (४८) फहीम अश्रफ ३/१६ (३ षटके) | सरफराज अहमद २८ (२६) थिसारा परेरा ३/२४ (४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- फहीम अश्रफ (पा) हा टी२० मध्ये हॅट्ट्रीक घेणारा पाकिस्तानचा पहिला आणि एकूण सहावा गोलंदाज.[४६]
३रा टी२०
पाकिस्तान १८०/३ (२० षटके) | वि | श्रीलंका १४४/९ (२० षटके) |
शोएब मलिक ५१ (२४) दिलशान मुनावीरा १/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: चतुरंगा डी सिल्व्हा (श्री).
संदर्भ आणि नोंदी
- ^ "भविष्यातील दौर्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वर्कलोड मॅनेजमेंट अँड इट्स डिफरंट स्ट्रोक्स". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "सर्व तीन प्रकारांत पाकिस्तानचे कर्णधारपद सरफराजकडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान वि श्रीलंका कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी अधिकार्यांची निवड". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दुबईमध्ये श्रीलंकेचा पहिला दिवस/रात्र कसोटी सामना". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका पाकिस्तानच्या पुढे सहाव्या क्रमांकावर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "उस्मानच्या २१ चेंडूंतील ५ बळींनंतर पाकिस्तानचा ५-० ने मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेचा सलग १२वा पराभव". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "सप्टेंबरमध्ये टी२० साठी पाकिस्तान दौर्यावर जाण्यास श्रीलंका 'उत्सुक'". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अशियाई क्रिकेट अध्यक्षांना क्रिकेटसाठी एकत्र उभे राहण्याचे सुमथिपला यांचे आवाहन –श्रीलंका ह्यावर्षाच्या शेवटी पाकिस्तानचा दौरा करणार". श्रीलंका क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "विश्व एकादश दौर्यानंतर सप्टेंबर मध्ये वेस्ट इंडीज, श्रीलंका पाकिस्तान दौरा करणार". द फिल्ड (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "श्रीलंका क्रिकेट खेळाडूंच्या सुरक्षिततेची काळजी घेईल". श्रीलंका क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेच्या पाकिस्तान दौर्याचा कार्यक्रम जाहीर". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान दौर्यावर जाण्यास श्रीलंकेचे खेळाडू नाखूष". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका लाहोरमध्ये टी२० खेळण्यास तयार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लाहोर टी२० साठी खेळाडूंकडू 'सकारात्मक प्रतिक्रिया', श्रीलंका मॅनेजर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लाहोरमध्ये खेळण्यास नकार देणारे खेळाडू संपूर्ण टी२० मालिकेस मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "लाहोरमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व थिसारा परेरा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लाहोरमध्ये श्रीलंकेच्या संघाभोवती सुरक्षेचे 'असाधारण' कडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "'आम्ही इथे येऊन आनंदी आणि भाग्यवान आहोत' – श्रीलंका क्रिकेट अध्यक्ष". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट खेळणार्या मोठ्या देशांकडून पाकिस्तानी दौरे पुन्हा सुरवात करण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षांची आशा". स्काय स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लाहोरच्या महत्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानचा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एमर्जिंग आशिया चषक २०१८चे आयोजन पाकिस्तान करणार". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान लूक टू सोहेल, सलाहुद्दीन इन पोस्ट-मिसयू एरा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "समरविक्रम, रोशन सिल्वा श्रीलंका कसोटी संघामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान एकदिवसीय संघात इमाम-उल-हकला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान एकदिवसीय मालिकेच्या श्रीलंका संघातून मलिंगाला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्ध टी२० साठी हफीजचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नडगीच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून आमिर बाहेर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नुवान प्रदीप पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय संघातून दुखापतीमुळे बाहेर, त्याच्यासागी गमागेची निवड". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात सादीरा समरविक्रमची निवड". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सरफराजस पाकिस्तान लूक टू बिल्ड ऑन मिस्बाहज रेन" (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "करुणारत्ने, चंदिमलमुळे श्रीलंका सुरक्षित" (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "यासिर शाह, कसोटी मध्ये सर्वात जलद १५० बळी घेणारा फिरकी गोलंदाज" (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अझर अली जॉइन्स पाकिस्तान्स ५००० टेस्ट क्लब" (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "४०० कसोटी बळी घेणारा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज" (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "१ल्या कसोटीत रंगना हेराथच्या फिरकीपूढे पाकिस्तानची फलंदाजी नाट्यमयरित्या कोसळली, श्रीलंकेचा २१ धावांनी विजय" (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "विजय आवश्यक असणार्या सामन्यात पाकिस्तान हेराथच्या गोलंदाजीबाबत सावध". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बाबर आझमची युएई मध्ये सलद पाच शतके". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी / संपूर्ण डावात नाबाद राहणारे फलंदाज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी / पदार्पणातील शतके". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हसनचे पाच बळी, इमामच्या पदार्पणातील शतकाने श्रीलंका पराभूत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्ध तिसर्या एकदिवसीय सामन्यात हसन अलीने वकार युनिसचा विक्रम मोडला". क्रिकेटनेक्स्ट (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "खानच्या विक्रमी पाच बळींनी श्रीलंकेची वाताहत". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान टी२० साठी श्रीलंकेच्या कर्णधारपदी थिसारा". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "फहीम अश्रफ, टी२० हॅट्ट्रीक घेणारा पाकिस्तानचा पहिलाच गोलंदाज". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.