श्रीराम कोल्हटकर
श्रीराम भालचंद्र कोल्हटकर ( - ०३ ऑगस्ट २०१९) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते होते. ते डोंबिवलीत राहत असत. त्यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीच्याच टिळकनगर विद्यालयातून झाले होते. ते मुंबई विद्यापीठाचे पदवीधर होते. श्रीराम कोल्हटकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात अभिनय केला होता. त्यांचे वडील भालचंद्र कोल्हटकर (निधन : २० मार्च २०१९) हेही नाट्यकर्मी होते.
चित्रपट
- अ डॉट कॉम मॉम
- आपला माणूस
- उंच भरारी
- एक अलबेला
- करले तू भी मोहब्बत (हिंदी)
दूरचित्रवाणी मालिका
- तुझ्यात जीव रंगला या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांची बलसारा सर ही भूमिका होती.
- अवघाचि संसार या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांची घारे सर ही भूमिका होती.