श्रीरंग विष्णू जोशी
श्रीरंग विष्णू जोशी हे एक मराठी लघुकथालेखक व कवी आहेत. शांता शेळके यांच्या 'स्मरणातल्या कविता' या कवितासंग्रहात श्री.वि. जोशी यांच्या 'आईची कविता' नावाच्या कवितेचा समावेश झाला होता. शांता शेळकेंनी अन्तर्नाद मासिकातल्या एक सदरात सदर कवितेचे परीक्षण लिहिले होते.
श्रीरंग विष्णू जोशी यांची पुस्तके
- अनुदिनी अनुतापे
- इंद्रियांचा गाव
- झरोका
- धुके (माधव नागदा आणि वि.स. खांडेकर यांचे याच नावाचे कथासंग्रह, ललित लेखसंग्रह आहेत).
पुरस्कार
- श्रीरंग विष्णू जोशी यांच्या 'इंद्रियांचा गाव' या पुस्तकाला कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला आहे (सन २०१०)
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेकडून श्रीरंग विष्णू जोशी यांना 'आचार्य अत्रे प्रतिभारंग' हा पुरस्कार प्रदान झाला. (५ नोव्हेंबर २०१८)