Jump to content

श्रीनिवास शिंदगी

श्रीनिवास शिंदगी
जन्म नाव श्रीनिवास नारायण शिंदगी.
जन्मइ.स. १९२९
मुधोळ, कर्नाटक.
मृत्यूजुलै १२,इ.स. २०१८
सांगली
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू ब्राह्मण
कार्यक्षेत्रसांगली
भाषा कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी
साहित्य प्रकार बालनाट्य,कविता,एकांकिका,कथा
चळवळ गोवा मुक्ती संग्राम
वडील कै.नारायण निळकंठ शिंदगी
आई कै.रमाबाई नारायण शिंदगी
पत्नी इंदिरा श्रीनिवास शिंदगी
अपत्ये वंदना, विवेक, वैशाली, निलेश

श्रीनिवास शिंदगी (जन्म : इ.स. १९२९; - १२ जुलै २०१८) यांना मराठी बालरंगभूमीचे जनक म्हणतात. त्यांच्या दीर्घ योगदानाबद्दल सांगली येथे मराठी नट केशवराव दाते यांनी ही उपाधी दिली होती. ते कवी आणि लेखकही होते. त्यांनी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट लेख, बालगीते, एकांकिका व देशभक्तिपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांची व्यावसायिक नाटकेही आहेत.ते प्रखर देशभक्त व सावरकर भक्त होते. लहान वयात त्यांना साक्षात वीर सावरकर यांचा सहवास लाभला होता. त्यांचे आयुष्य सावरकर प्रेरणेने भारलेले होते. []

पुरस्कार

  • 'झी २४ तास'चा 'अनन्य सन्मान पुरस्कार' (२०१५)
  • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कार (२००९)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचा अ. सी. केळुस्कर स्मृति पारितोषिक (२०१३)

संदर्भ

  1. ^ "बालरंगभूमीचे जनक श्रीनिवास शिंदगी यांचे निधन". लोकसत्ता. १२ जुलै २०१८. १२ जुलै २०१८ रोजी पाहिले.