Jump to content

श्रीकृष्ण चंद्रात्रे

श्रीकृष्ण चंद्रात्रे हे प्रामुख्याने भक्तिगीते आणि आरत्या यांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक-गायक आहेत. त्यांनी अनेक भावगीतेही संगीतबद्ध केली आहेत.

श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या प्रसिद्ध गीतांचे मुखडे (सुमारे ५७)

  • अगे अगे कैकयीबाई (गायिका - उत्तरा केळकर)
  • अजुनी घाव ओला (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
  • अफाट शक्ती, अचाट बुद्धी (गायक - शाहीर विठ्ठल उमप)
  • आला सुसाट हा वारा (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
  • ओघळणारी पुसुनी आसवे (भावगीत, गायक - प्रभाकर कारेकर)
  • कमळ नयन कमळ वदन (गायक - प्रभाकर कारेकर)
  • कशासाठी येऊ देवा (गायक - रामदास कामत)
  • गॊविंदा रे गोविंदा (गायक - प्रभाकर कारेकर)
  • जे जे दिसते आज इथे (भावगीत, गायक -श्रीकृष्ण चंद्रात्रे)
  • ती गर्द दाट राने (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
  • तुझी मूर्ती सुंदर देवा (कवी - राम उगावकर, गायक - रामदास कामत, प्रभाकर कारेकर)
  • तू ईश्वर मी तव भक्त (उत्तरा केळकर)
  • तोची आदी तोची अंत (कवी - राम उगावकर, गायक - रामदास कामत)
  • दुपारच्या उन्हामधी छाया झाडाची पहावी (कवी - राम उगावकर, गायक -जयवंत कुलकर्णी)
  • प्रार्थना गुरुमाउली (गायिका - रंजना जोगळेकर)
  • प्रीतिचे गीत गाऊ कसा (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
  • फुटे पावसाळी ढग (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
  • बहरून रात्र येता (भावगीत, गायिका - सोनाली चंद्रात्रे)
  • मंगल पावन निर्मल जीवन (गायक - रामदास कामत)
  • मन माणसाचे वेडे (भावगीत, गायक - प्रभाकर कारेकर)
  • मावळतीने आता म्हणले (भावगीत, गायक - रामदास कामत)
  • वादळी वारा टपोऱ्या गारा (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
  • वाक्या कोळ्याचा वाल्मिकी झाला (कवी - राम उगावकर, गायक -जयवंत कुलकर्णी)
  • सांगू कसे मनाला (भावगीत, गायिका - सोनाली चंद्रात्रे)
  • हलकेच रात्र यावी (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
  • हे श्याम रे, हे राम रे (गायिका - रंजना जोगळेकर)


श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या गाण्यांचे आल्बम (एकूण ८)

  • आराधना
  • गोविंदा रे गोपाला
  • जय अंबे जय जगदंबे (कवी - प्रवीण दवणे, गायिका - लता मंगेशकर)
  • तुझी मूर्ती सुंदर देवा
  • महाशिवरात्री स्पेशल
  • लोकरामायण (३ भाग)
  • श्रावणात घन नीळा (भावगीते)
  • सूर वाऱ्यातला


पुरस्कार

  • नाशिकच्या त्रिवेणी महोत्सवात संस्कृती वैभव पुरस्कार (डिसेंबर २०१८)