श्रीकांत येळेगावकर
प्रा. डाॅ. श्रीकांत येळेगावकर हे सोलापुरात राहणारे एक मराठी लेखक आहेत. ते 'सोलापूर सोशल असोसिएशन ऑफ आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलज'मध्ये १९७८ साली राज्यशास्त्राचे प्राध्यापक झाले.. नोकरीत असतानाच त्यांनी १९८६ साली कोल्हापूर विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर काही वर्षांनी ते सोलापूरच्या के.पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक व प्राचार्य झाले. डॉ. श्रीकांत येळेगावकर हे ‘एआयसीटीई’(All India Council for Technical Education)च्या नियमानुसार प्राचार्य पदासाठी पात्र नसल्याची तक्रार विद्यापीठाकडे आली होती. त्याचबरोबर संस्थेच्या लोकांनीही डॉ. येळेगावकर यांच्या विरोधात विद्यापीठाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींनुसार १२ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी डॉ. येळेगावकरं यांची प्राचार्यपदावर झालेली नेमणूक रद्द केली. यां आदेशाविरुद्ध येळेगावकरांनी विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधीकरणाकडे अपील केले. या केसचा निकाल येळेगावकरांच्या बाजूने लागून ते पूर्ववत प्राचार्यपदावर विराजमान झाले. या प्रकरणात कुलुगुरूंनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल न्यायाधीशांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना वीस हजार रुपयांचा दंड केला.
श्रीकांत येळेगावकर हे 'फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया' या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ते सोलापूर विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व सोलापूर विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य आहेत. ते सध्या सोलापूर शहरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह म्हणूनही कम करतात.
येळेगावकरांची 'निग्रह गांधीवादी मार्शल जाजू', व 'सोलापूरचे स्वातंत्र्यलढ्यातील दीपस्तंभ' ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत..
श्रीकांत येळेगावकर यांनी लिहिलेली पुस्तके
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरचे दीपस्तंभ
- निग्रही गांधीवादी मार्शल रामकृष्णजी जाजू
- वंदनीय व्यक्तिमत्त्वे
- सोलापूरचे स्वातंत्र्य लढ्यातील दीपस्तंभ