श्रीकांत बहुलकर
श्रीकांत बहुलकर हे एक प्राच्यविद्या संशोधक आहेत. पुण्याच्या भांडारकर संस्थेतून ते निवृत्त झाले आणि अजूनही ते तेथे संशोधनाचे काम करत असतात. तेथे ते मानद सचिव आहेत.[ संदर्भ हवा ]
श्रीकांत बहुलकर यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील बहुळ होय. या छोट्याशा खेड्यातून पुण्यात येऊन बहुलकर यांनी अथर्ववेदातील भैषज्य (औषधिशास्त्र) या विषयावर संशोधन केले.[ संदर्भ हवा ] डॉक्टरेट पूर्ण केल्यावर शिष्यवृत्ती मिळवून ते जपानला गेले. तेथे त्यांनी तिबेटी भाषा शिकून तिबेटी औषधिशास्त्राचा अभ्यास केला.[ संदर्भ हवा ]
यातून त्यांनी अकस्मात वज्रयान या बौद्ध पंथाचा सखोल अभ्यास केला. बहुलकर हे वेद आणि बौद्ध तंत्र विषयातील जागतिक स्तरावर तज्ज्ञ समजले जातात.[ संदर्भ हवा ]
त्यांनी जपान, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड्स, रोमेनिया, फिनलंड, रशिया, अमेरिका, थायलंड इत्यादी देशांतील विद्यापीठांतून, शैक्षणिक संस्थांमधून व्याख्याने दिली आहेत.[ संदर्भ हवा ]
विवाद
जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या 'ए हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या शिवाजीवर लिहिलेल्या पुस्तकासाठी लेखकाला अपमानास्पद माहिती पुरवण्याकरिता जबाबदार ठरवून रामभाऊ पारिख नावाच्या शिवसैनिकाने २२ डिसेंबर २००३ रोजी बहुलकरांच्या तोंडाला काळे फासले. नंतर त्याबद्दल राज ठाकरे यांनी २७ डिसेंबर २००३ रोजी त्यांची माफी मागितली.[१]
पदे
- पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (तत्कालीन) बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्यपद.[ संदर्भ हवा ]
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील संस्कृतचे विभागप्रमुख आणि साहित्य व ललितकला विद्याशाखेचे अधिष्ठाता.[ संदर्भ हवा ]
- सारनाथ येथे तिबेटच्या अध्ययनाकरिता स्थापलेल्या केंद्रीय विद्यापीठाच्या दुर्मीळ बौद्ध हस्तलिखित संशोधन विभागाचे प्रमुख संपादक.[ संदर्भ हवा ]
- हार्वर्ड विद्यापीठाच्या डिव्हिनिटी स्कूलमध्ये मानद प्राध्यापकपद.[ संदर्भ हवा ]
- ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रामध्येही अभ्यागत प्राध्यापक.[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
- अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यातील संशोधनाबद्दल दिल्लीच्या साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
- मुंबईच्या एशियाटिक सोसायटीकडून महामहोपाध्याय पां.वा. काणे स्मृती सुवर्णपदक.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
- ^ "Raj Thackeray apologises to Bahulkar". टाइम्स ऑफ इंडिया. रोजी मूळ पानापासून संग्रहित2018-12-13. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)