Jump to content

श्रीकांत जिचकार

डॉ श्रीकांत जिचकार

खासदार
कार्यकाळ
१९९२ – १९९८

जन्म १४ सप्टेंबर १९५४ (1954-09-14)
काटोल
मृत्यू २ जून, २००४ (वय ४९)
नागपूर
राजकीय पक्ष काँग्रेस
पत्नी राजश्री जिचकार
अपत्ये

श्रीकांत जिचकार (१४ सप्टेंबर, इ.स. १९५४ - २ जून, इ.स. २००४) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते[]. अल्पावधीमध्ये मिळवलेल्या बहुआयामी यशामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते.

सुरुवातीचे शिक्षण

जिचकारांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात ही एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमापासून केली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यासक्रम घेऊन एल.एल.एम. पदवी घेतली. त्यांनी इ.स. १९९० पर्यंत एकूण ४२ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या व यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक, इतर परीक्षांमध्ये प्रथम वर्ग मिळवला. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते[]. यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह होता.

जिचकारांच्या पदव्या

जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. जिचकरांनी १० विषयांत एम ए केले. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व व मानसशास्त्र यांचा समावेश आहे. जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली. ते आय.पी.एस. (इंडियन पोलीस सर्व्हिस-उत्तीर्ण) होते आणि आय.ए.एस.(इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस-उत्तीर्ण)ही होते. जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

सामाजिक

त्यांनी इ.स. १९७८ मध्ये भारतीय पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली व इ.स. १९८० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले. ४ महिन्यामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी या सेवेचा राजीनामा दिला. ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते.

श्रीकांत जिचकार पत्रकार होते आणि कीर्तनकारही होते. ते वकील होते, पोलीस होते आणि डॉक्टरही होते.

राजकीय

जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये इ.स. १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते []. त्यांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता []. इ.स. १९९२ साली त्यांची भारताच्या राज्यसभेवर निवड झाली. ते इ.स. १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो व युनिस्को संघटनांसाठी ही काम केले.

निधन

जिचकारांचा २ जून, इ.स. २००४ रोजी नागपुराजवळ कोढली गावानजीक घडलेल्या कार-अपघातामध्ये मृत्यू झाला. याप्रकऱणी २ नोव्हेंबर २०१३ रोजी कोर्टाने जिचकारांच्या कार-ड्रायव्हरसह एसटी महामंडळालाही जबाबदार धरले आणि जिचकार यांच्या कुटुंबीयांना ५० लाख ६७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "श्रीकांत जिचकार किल्ड इन अ‍ॅन अ‍ॅक्सिडेंट (श्रीकांत जिचकार एका अपघातात मृत)" (इंग्लिश भाषेत). ३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "With 20 degrees, Nagpur's Dr Shrikant Jichkar was most qualified person in India". Nation Next (इंग्रजी भाषेत). 2020-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-14 रोजी पाहिले.
  3. ^ "5 Facts You Should Know About Dr. Shrikant Jichkar, The Most Qualified Man In India". The Story Pedia (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "At a Glance: Late Dr Shrikant Jichkar, India's one of the most learned politicians".

बाह्य दुवे