Jump to content

श्रीअरविंद स्मारक व्याख्यान-माला

श्रीअरविंद स्मारक व्याख्यान-माला: दर तीन वर्षांनी ही व्याख्यानमाला पुणे विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येत असे.

व्याख्यानमालेचा तपशील

पहिली व्याख्यानमाला इ.स.१९७२ साली पाँडिचेरीच्या श्री अरविंद आश्रम शिक्षणकेंद्राचे प्रबंधक व भारत सरकारचे शिक्षण-सल्लागार असणाऱ्या श्री. किरीट जोशी यांनी गुंफली. त्यानंतर क्रमाने म्हणजे इ.स. १९७५ साली श्री.दिलीपकुमार रॉय, आणि इ.स. १९७८ साली पाँडिचेरीच्या श्रीअरविंद आश्रमातील सचिव श्री.माधव पंडित यांनी पुढील पुष्पे गुंफली. इ.स. १९८० साली डॉ. गजानन नारायण जोशी यांनी चौथे पुष्प गुंफले.[]

व्याख्यानमालेची जन्मकथा

इ.स. १९७० साली पुणे विद्यापीठातर्फे अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे ४४ वे अधिवेशन पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. स्थानिक कार्यवाह डॉ. गजानन नारायण जोशी होते, तर कार्यवाह डॉ.सुरेंद्र बारलिंगे होते. या अधिवेशनास अपेक्षेपेक्षा अधिक यश आले आणि देणग्यांच्या रूपाने मोठा निधी जमा झाला. तेव्हा अधिवेशनाचा खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या रकमेतून श्रीअरविंद स्मारक व्याख्यान-माला चालविण्यात यावी, हा विचार मांडण्यात आला. ती सूचना पुणे विद्यापीठाने त्वरित मान्य केली आणि त्यातून या व्याख्यानमालेची निर्मिती झाली.[]

व्याख्यानमालेची परिणती

इ.स. १९८० साली डॉ. गजानन नारायण जोशी यांनी जे चौथे पुष्प गुंफले, त्यामध्ये तीन व्याख्यानांचा समावेश होता. त्या व्याख्यानांवर आधारित श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन हा अभ्यासपूर्ण संदर्भ-ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.

संदर्भ

  1. ^ a b डॉ.गजानन नारायण जोशी (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे: पुणे विद्यापीठ.