Jump to content

श्रीअरविंद सोसायटी

स्थापना

१९ सप्टेंबर १९६० रोजी श्रीमाताजी यांनी पुडुचेरी येथे श्रीअरविंद सोसायटीची स्थापना केली. त्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष होत्या. [] गेल्या काही वर्षांत, सोसायटी जीवनाच्या विविध क्षेत्रात काम करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था बनली आहे.

  • सोसायटी नोंदणी कायदा, १८६० अंतर्गत एक संस्था
  • भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या DSIR अंतर्गत सामाजिक विज्ञानातील संशोधन संस्था
  • आयकर कायदा, १९६१ च्या कलम 10 (23C)(iv) अंतर्गत संपूर्ण भारतातील महत्त्वाची संस्था

उद्दिष्ट

श्रीअरविंद सोसायटी भौतिक जीवनात आणि त्याच्या सर्व क्रियाकलापांमध्ये गतिमान अध्यात्म आणण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून जागतिक समस्यांवर खरे उपाय शोधता येतील आणि मानवाने युगानुयुगे पाहिलेली स्वप्ने, साकार होऊ शकतील.

मुखपत्र

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे साहित्य विविध भाषांमधून प्रसारित करण्याचे कार्यही सोसायटीतर्फे केले जाते. All India Magazine हे सोसायटीचे मुखपत्र असून, त्याच्या कन्नड, ओरिया, हिंदी, बंगाली, गुजराती, तमिळ इ. भाषांमध्ये आवृत्त्या निघतात. त्याची मराठी आवृत्ती अभीप्सा मासिक या नावाने प्रकाशित होते.

कार्यक्षेत्र

श्रीअरविंद सोसायटी खालील क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सर्वांगीण शिक्षण, ग्रामीण विकास, शाश्वत विकास, आरोग्य, भारतीय संस्कृती, संस्कृत, कला, युवाविकास.

कार्यकक्षा

श्रीअरविंद सोसायटीचे कार्य केंद्र आणि शाखा अशा दोन प्रकारे चालते. देशविदेशांमध्ये मिळून सुमारे ३२५ केंद्र व शाखा कार्यरत आहेत. भारताव्यतिरिक्त केन्या Archived 2023-03-04 at the Wayback Machine., सिंगापूर, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सोसायटीचे कार्य चालू आहे.

बाह्य दुवे

अधिकृत संकेतस्थळ

  1. ^ "श्रीअरविंद सोसायटी".