Jump to content

श्रीअरविंद आणि महाराष्ट्र (पुस्तक)

श्रीअरविंद आणि महाराष्ट्र हे पुस्तक क्रांतिकारक अरविंद घोष (उत्तरायुष्यात योगी श्रीअरविंद) आणि महाराष्ट्र यांच्या अनुबंधावर प्रकाश टाकते. या पुस्तकाचे लेखन व संकलन सुहासिनी देशपांडे यांनी केले आहे.

पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

श्रीअरविंद १३ जानेवारी १९०८ रोजी लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी आणि व्याख्यानासाठी पुण्यात आले होते. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ १३ जानेवारी २०२३ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. केसरी वाड्यात झालेल्या या कार्यक्रमात टिळकांचे वंशज म्हणून श्री.दीपक टिळक उपस्थित होते. श्रीअरविंद सोसायटी, पॉण्डिचेरीचे अध्यक्ष श्री.प्रदीप नारंग उपस्थित होते.[]

श्रीअरविंद आणि महाराष्ट्र
लेखकसुहासिनी देशपांडे
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारलेखसंग्रह
प्रकाशन संस्थाश्रीअरविंद सोसायटी, मुंबई शाखा
प्रथमावृत्ती१३ जानेवारी २०२३
मुखपृष्ठकारवेदान्त रेशमिया
विषयश्रीअरविंद आणि महाराष्ट्र - अनुबंध
पृष्ठसंख्या३०४

पुस्तकाची मांडणी

पुस्तकाच्या प्रारंभी प्रस्तावना, मनोगत आणि प्रयोजन अशी तीन प्रकरणे आहेत.

पुस्तकामध्ये एकंदर दहा लेख आहेत. यामध्ये श्रीअरविंद यांचे संक्षिप्त चरित्र आहे. श्रीअरविंद आणि मराठी माणूस यांचे नाते, त्यांची महाराष्ट्रातील प्रवास आणि भाषणे, राजकीय स्थिती, श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक, क्रांतिकारक श्रीअरविंद, प्रत्यक्ष राजकारणात श्रीअरविंद, विभाजनाच्या दिशेने काँग्रेस, बडोद्यातील वास्तव्य आणि भावी जीवनाची पायाभरणी, श्रीअरविंदांचा आध्यात्मिक राष्ट्रवाद यांचा समावेश आहे.

आवश्यक तेथे श्रीअरविंद यांच्या वचनांचा अनुवाद करून तो समविष्ट करण्यात आला आहे.

शेवटी सहा परिशिष्टाची जोड दिली आहे, त्यामुळे पुस्तकाचे संदर्भ मूल्य वाढले आहे.

श्रीअरविंद यांच्या जीवनाचा काळपटही देण्यात आला आहे. संदर्भग्रंथांची सूची शेवटी देण्यात आली आहे. []

उपयुक्तता

टिळक युगातील राजकीय स्थिती, सुरत काँग्रेस आणि त्याची पार्श्वभूमी व त्याचे परिणाम समजावून घेण्यासाठी, विशेषतः या पार्श्वभूमीवर क्रांतिकारक अरविंद घोष यांचे राजकारणातील स्थान समजावून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे.

संदर्भ

  1. ^ अभीप्सा मासिक, फेब्रुवारी २०२३, शाखावृत्त
  2. ^ श्रीअरविंद आणि महाराष्ट्र, सुहासिनी देशपांडे