श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन
स्थापना
श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन ही श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी याची एक शाखा आहे. श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष यांच्या शिक्षणविषयक संकल्पनांना मूर्त रूप देण्याच्या हेतुने श्रीमाताजी ऊर्फ मीरा अल्फासा यांनी दि. २ डिसेंबर १९४३ रोजी या सेंटरची स्थापना केली.
इतिहास
महायोगी श्रीअरविंद अरविंद घोष यांच्या समाधीनंतर, पुढे १९५१ मध्ये, पाँडिचेरी येथे एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये श्रीअरविंद यांचे उचित स्मारक व्हावे या हेतुने 'आंतरराष्ट्रीय विद्यापीठ केंद्र' स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार, दि. ०६ जानेवारी १९५२ रोजी श्रीमाताजींच्या हस्ते 'श्रीअरबिंदो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. १९५९ मध्ये, त्याचे नाव बदलून 'श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन' असे करण्यात आले.
वैशिष्ट्य
येथील शिक्षणपद्धतीचा गाभा समग्र शिक्षण (Integral Education) हा आहे. या पद्धतीस Free Progress Education असेही संबोधले जाते. या शिक्षणाचे शारीरिक शिक्षण, प्राणिक शिक्षण, मानसिक शिक्षण, आंतरात्मिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण हे पाच पैलू आहेत. येथे बालवाडीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंतचे शिक्षणाची सोय आहे.
नियतकालिके
बुलेटिन - श्रीअरविंद आश्रमातर्फे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या तत्त्वज्ञान आणि योगाशी संबंधित अनेक नियतकालिके प्रकाशित केली जातात. त्यातील एक म्हणजे श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनचे बुलेटिन. त्याचे नाव बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन - हे बुलेटिन एकाच वेळी इंग्रजी-फ्रेंच मधून प्रकाशित होते. हे त्रैमासिक असून, पाँडिचेरी येथून, इ.स. १९४९ पासून प्रकाशित होत आहे.
द गोल्डन चेन - श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन च्या माजी विद्यार्थ्यांचे हे त्रैमासिक आहे.[१]
अधिकृत संकेतस्थळ
संदर्भ
- Collected works of The Mother, Published by Sri Aurobindo Ashram., Vol : 12 : Pg 39-47
- Principles and Goals of Integral Education by Jugal Kishor Mukharji, ISBN 81-7058-806-5