श्राविका आश्रम संस्था
श्राविका आश्रम ही संस्था सम्राट चौकामधील बुधवार पेठेत आहे. सोलापुरात शैक्षणिक क्षेत्रात मुलींना शिक्षण देणारी संस्था म्हणून ती नावाजलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना सुमतीबाई शहा यांनी केली आहे. श्राविका आश्रमाचे मुख्य उद्दिष्ट “लौकिक व धार्मिक शिक्षण” देणे हे आहे. या आश्रमाचे ब्रीदवाक्य “जहाँ सुमति तहाँ संपत्ती नाना” ज्या स्त्रियांच्या जीवन संपलेला आहे. अशा स्त्रियांना स्वावलंबी करण्याचे दुःख नष्ट करण्याचे व त्यांना जीवनात समाधान प्राप्त करून देण्याचे कार्य हे आश्रम करते. अपंग, निराधार, परितक्त्या या स्त्रियांना आधार देऊन शिक्षित करणे, काम शिकविणे व त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मानधन देणे हे कार्य हे आश्रम करते. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे आणि आपण कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करते. आश्रमातील प्रत्येक विभागाला थोर स्त्रियांची नावे दिली आहेत. त्यामध्ये वंदना, सीता, द्रोपदी, अंजना, उर्मिला इत्यादी प्राचीन काळातील महान आदर्श स्त्रिया नावे दिलीत. हा आदर्श स्त्रिया डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे. या आश्रमाची सुरुवात जुने इमारती मध्ये झाली होती. या जुन्या इमारतीतील खोल्यांना या स्त्रियांची नावे दिली होती. पण नंतर नवीन इमारत मधील खोल्यांना 16 भावनांची नावे दिली आहेत.
आश्रमामध्ये श्री चतुराबाई श्राविका बालमंदिर शाळा 15 ऑगस्ट 1912 साल स्थापन झाली. शाळा सोलापूरमधील फलटण गल्ली शहाच्या वाड्यात सुरू केले. नंतर ती सम्राट चौकातील बुधवार पेठेत हलविण्यात आली. येथे मुलींना शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. सर्व जाती, जमातीतील मुलींना प्रवेश दिला जात असे. मुलींच्या विकासाला चालना दिली जाते, मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करते, मुलींना स्वावलंबी बनवते, धार्मिक व लौकिक म्यानातून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करते, अशीही श्राविका आश्रम ही आज तागायत शिक्षण क्षेत्रात भरारी घेत आहे.
संस्थांमध्ये जवळपास तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात प्रगती करणारे श्राविका संस्थान आहे.
= फोटो
१
२