श्रावणी शुक्रवार
श्रावणी शुक्रवार हा श्रावण महिन्यातील शुक्रवारचा दिवस आहे.
या तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव
- जरा-जवंतिका पूजन
श्रावणी शुक्रवार – श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जिवतीचा पूजा करतात. चित्राची पूजा करणे चांगलेच, पण समाजात अनेक निष्पाप निराधार बाळांना हवा असतो मायेचा हात ! गडचिरोलीचे काम करणाऱ्या डॉ. अभय बंग व राणी बंग यांनी कुपोशित बालकांसाठी असा मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या व्रतात आपलाही सहभाग हवा ज्यामुळए या कुपोषित बालकांना संजीवन मिळेल. फार दूर कशाला, आपल्याच घरात धुण-भांडी करणारी बाई आपल्या नवजात शिशूला, कच्च्याबच्च्यांना घरी ठेवून कामावर येते. तिच्या मुलांना काही दुखलं खुपलं तर पुढे होऊन मदत करूया. त्या लहान मुलांच्या औषध पाण्याची, लसीकरणाची जबाबदारी घेऊन त्यांना रोगमुक्त करणे हे नक्कीच आपल्याला शक्य आहे. किमान वर्षभर तरी हे व्रत घ्यावे.