श्रद्धा कक्कड
श्रद्धा कक्कड | |
---|---|
जन्म | १९ सप्टेंबर 1991 अमरावती, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
श्रद्धा कक्कड ( १९ सप्टेंबर 1991) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि पूर्वीची फॅशन मॉडेल आहे. तिला इ.स. २०१८ मध्ये 'मिसेस युनायटेड नेशन्स' हा पुरस्कार मिळाला.[१][२][३]
वैयक्तिक जीवन
महाराष्ट्रातील नाशिक येथील एका व्यावसायिक कुटुंबात श्रद्धा कक्कड यांचा जन्म झाला, श्रद्धा यांचे वडील एक नामवंत व्यावसायिक होते, इयत्ता १० मध्ये असताना अचानक तिच्या वडिलांना व्यवसायात तोटा झाला, आणि संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडले, त्यामुळे शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून श्रद्धा ने सिमकार्ड देखील विकले. त्यानंतर पुण्यात येऊन सिंहगढ़ इंस्टिट्यूट मध्ये इंटीरियर डिजाइनिंग पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि शिक्षणासोबतच आईसीआईसीआई बैंक मध्ये लोन डिपार्टमेंट मध्ये काम देखील केले.[२][४]
कारकिर्दीची सुरुवात
पुणे येथे शिक्षण सुरू असतानाच श्रद्धा ने २००५ या वर्षी 'मिस पुणे' या सौंदर्यवती स्पर्धेत भाग घेतला त्यात ती फर्स्ट रनरअप म्हणून विजयी झाली, त्यानंतर तिने मॉडलिंगच्या अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमद्धे भाग घेतला आणि पुरस्कार मिळवले.[४]
मिसेस युनायटेड नेशन्स
श्रद्धा कक्कड यांनी 21 ते 28 जुलै दरम्यान जमैका येथे पार पडलेल्या 'मिसेस युनायटेड नेशन्स' या स्पर्धेत ८० देशातील सौंदर्यवतींना मागे टाकत हा बहुमान मिळवला. या स्पर्धेत तिने आशिया विभागाचे नेतृत्व केले.[३][५]
संदर्भ
- ^ "पुण्याची श्रद्धा कक्कड ठरली मिसेस युनायटेड नेशन्सची मानकरी". 24taas.com. 2018-08-27. 2020-06-22 रोजी पाहिले.
- ^ a b "Mrs United Nations Shraddha Kasar Kakkad is helping needy during COVID pandemic". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2020-06-17. 2020-06-22 रोजी पाहिले.
- ^ a b "Asia's Pride Shraddha Kakkad Wins 'Mrs United Nations'". mid-day (इंग्रजी भाषेत). 2020-06-01. 2020-06-22 रोजी पाहिले.
- ^ a b "अपना खर्च उठाने कभी बेचे सिमकार्ड, अब इंटरनेशनल लेवल पर एशिया को करेंगी रिप्रेजेंट". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-07-07. 2020-06-22 रोजी पाहिले.
- ^ "पुण्याच्या श्रद्धा कक्कड 'मिसेस युनायटेड नेशन्स' | eSakal". www.esakal.com. 2020-06-22 रोजी पाहिले.