Jump to content

श्यामला माजगांवकर

श्यामला माजगांवकर
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

शामला माजगांवकर या मराठीतील एक नामवंत शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका होत्या.

पूर्वायुष्य

त्यांचे संगीत शिक्षण उस्ताद अल्ताफ हुसेन खान यांचे चिरंजीव खादीम हुसेन खान, यांच्याकडे झाले होते. श्यामलाबाई आणि त्यांच्या भगिनी, प्रसिद्ध गायिका हिराबाई जव्हेरी, या दोघींनी मिळून मुंबईत इ.स.१९२९ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘स्वामी समर्थ संगीत विद्यालया‘ची स्थापना केली. स्त्रियांनी स्त्रियांसाठी व लहान मुलांसाठी मुंबईत काढण्यात आलेले हे पहिलेच संगीत विद्यालय होते. मुंबईत या विद्यालयाच्या खार, चर्नीरोड, आणि दादर(हिंदू कॉलनी) येथे शाखा होत्या. लीला चिटणीस, नलिनी जयवंत, जयश्री वणकुद्रे (व्ही.शांताराम यांच्या पत्नी), मोहनतारा तळपदे-अजिंक्य, जयश्री गडकर-धुरी अशा कितीतरी मुली या विद्यालयात शिकून पुढे जीवनात मोठ्या झाल्या. समाजवादी नेत्या मृणाल गोरे याही श्यामला माजगांवकरांकडे काही दिवस संगीत शिकत होत्या.

शामला माजगांवकर यांच्या भगिनी हिराबाई जव्हेरी या स्वतः सतार, बाजाची पेटी आणि तबलासुद्धा उत्तम वाजवीत आणि शिकवीतही. प्रसिद्ध गायिका मधुबाला जव्हेरी-चावला ह्या हिराबाई जव्हेरींच्या कन्या.

शामला माजगांवकर यांची ध्वनिमुद्रित होऊन गाजलेली गाणी

  • कन्हय्या बजाव बजाव मुरली (गोविंदाग्रज यांच्या प्रसिद्ध कवितेतल्या ४२ कडव्यांपैकी काही)
  • तुज मिळेल गं मिळेल सारी साथ (कवयित्री शांताबाई जोशी यांची कविता)

पुरस्कार व सन्मान

स्मृति पुरस्कार

हिराबाई जव्हेरी आणि श्यामला माजगांवकर यांच्या नावाने ‘संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार‘ दिला जातो. इ.स.२०१०मध्ये हा पुरस्कार भानू चरणकर यांना दिला गेला.

संगीत ध्वनिमुद्रिका