श्टायरमार्क
श्टायरमार्क Steiermark | |||
ऑस्ट्रियाचे राज्य | |||
| |||
श्टायरमार्कचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान | |||
देश | ऑस्ट्रिया | ||
राजधानी | ग्रात्स | ||
क्षेत्रफळ | १६,३९२ चौ. किमी (६,३२९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १२,१३,२५५ | ||
घनता | ७४ /चौ. किमी (१९० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | AT-6 | ||
संकेतस्थळ | http://www.steiermark.at |
श्टायरमार्क (जर्मन: Steiermark; इंग्लिश नाव: स्टायरिया) हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. ऑस्ट्रियाच्या आग्नेय भागात वसलेल्या श्टायरमार्कच्या दक्षिणेस स्लोव्हेनिया देश तर इतर दिशांना ओबरओस्टराईश, नीडरओस्टराईश, बुर्गनलांड, क्यार्न्टन व जाल्त्सबुर्ग ही राज्ये आहेत. आकाराने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असलेल्या श्टायरमार्कची लोकसंख्या सुमारे १३ लाख आहे. ग्रात्स ही श्टायरमार्कची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.