शोलिंगनाल्लूर
शोलिंगनाल्लूर | |
---|---|
वस्ती | |
शोलिंगनाल्लूर | |
शोलिंगनाल्लूर शोलिंगनाल्लूर | |
गुणक: 12°54′01″N 80°13′40″E / 12.90015°N 80.22791°Eगुणक: 12°54′01″N 80°13′40″E / 12.90015°N 80.22791°E | |
देश | भारत |
राज्य | तमिळनाडू |
मेट्रो | चेन्नई |
लोकसंख्या (२०११) | |
• एकूण | ७५०००० |
• लोकसंख्येची घनता | एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै) |
भाषा | |
Time zone | UTC+५:३० (भारतीय प्रमाण वेळ) |
पिन कोड | ६०० ११९ |
Vehicle registration | टी एन - १४ |
शोलिंगनाल्लूर हे चेन्नई, भारताचे दक्षिणेकडील उपनगर आहे. याला सोलिंगनल्लूर किंवा सोळिंगनलूर या नावांनीदेखील ओळखले जाते.
व्युत्पत्ती
तमिळ विद्वानांनी दिलेल्या व्युत्पत्तीनुसार याच्या नावात "चोला" + "अंगम" + "नल्लूर" असे शब्द आहेत. जे दर्शविते की शोलिंगनाल्लूर एकेकाळी चोला वसाहतीचा भाग होता. बहुधा ८ व्या शतकात ज्यापूर्वी हे खारफुटीचे जंगल असलेले दलदलीचा प्रदेश होता.
लोकसंख्याशास्त्र
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, [१] शोलिंगनाल्लूरची लोकसंख्या सुमारे ७.५ लाखांवर पोहोचली होती.
सरकार आणि राजकारण
शोलिंगनाल्लूर (राज्य विधानसभा मतदारसंघ) हा मतदारांच्या दृष्टीने तामिळनाडूमधील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे.[२]
नागरी प्रशासन
२०११ मध्ये शोलिंगनाल्लूर चेन्नई कॉर्पोरेशनशी जोडले गेले. चेन्नई कॉर्पोरेशनचा एक भाग म्हणून प्रशासित चेन्नई शहरातील शेवटचा (२०० वा) प्रभाग आहे.
अर्थव्यवस्था
शोलिंगनाल्लूर हे अनेक बीपीओ आणि आयटी/आयटीईएस कंपन्यांचे घर आहे. विप्रो,[३] इन्फोसिस,[४] टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यासह अनेक मोठ्या आयटी कंपन्या येथे आहेत.
गृहनिर्माण
तमिळनाडू गृहनिर्माण मंडळाने आयटी पार्क, मोठे रस्ते, शाळा, उद्याने, खेळाचे मैदान आणि बस टर्मिनससह शोलिंगनल्लूर येथे एक सॅटेलाइट टाउनशिप तयार केली आहे.
शोलिंगनाल्लूरच्या निवासी भागात अक्कराई, पनयूर, राजीव गांधी नगर, एमजीआर नगर, गणेश नगर आणि उथंडी (ईसीआर टोल प्लाझा) यांचा समावेश होतो. जे ईस्ट कोस्ट रोडवर आहेत. उथंडीला एक सार्वजनिक समुद्रकिनारा आहे ज्याला "कासवांच्या घरट्यांचे ठिकाण" म्हणून घोषित केले गेले आहे. येथे संकटग्रस्त ऑलिव्ह रिडले कासवे घरटे बनवतात आणि त्यात अंडी घालतात.[५]
वाहतूक
विमानाने
मीनमबक्कम येथील चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
रेल्वेने
सरकार या मार्गावर माधवरम ते सिरुसेरी आयटी पार्कपर्यंत मेट्रो ट्रेन-फेज २ बांधत आहे. हा मार्ग कॉरिडॉर-३ आणि कॉरिडॉर-५ साठी २०२४/२०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याची अंतिम मुदत आहे.
रस्त्याने
शोलिंगनाल्लूर हे ईस्ट कोस्ट रोड ते तांबरम, मुदिचूर आणि अडयार ते महाबलीपुरम यांना जोडणाऱ्या जंक्शनवर वसलेले आहे.[६] ते तांबरमपासून १४.३ किमी अंतरावर आहे. ईस्ट कोस्ट रोड पासून २ किमी दूर आहे. ममल्लापुरमपासून ३४.८ किमी दूर आणि अड्यारपासून १३.५ किमी दूर आहे.
ठिकाणे
महाविद्यालये
येथे काही महाविद्यालय आहेत. त्यात सत्यबामा विद्यापीठ, जेप्पियार अभियांत्रिकी महाविद्यालय, सेंट मेरी स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सेंट जोसेफ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि इतरही महाविद्यालये समाविष्ट आहेत.
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, चेन्नई कॅम्पस उथंडी, शोलिंगनाल्लूर येथे आहे.
संदर्भ
India दालन |
- ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.
- ^ "Tamil Nadu News : Solinganalloor biggest constituency in terms of voters". The Hindu. 2011-03-04. 29 June 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-02-24 रोजी पाहिले.
- ^ "Wipro IT Business | IT Services, Consulting, System Integration, Outsourcing". Wipro.com. 2011-12-31. 26 February 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-02-24 रोजी पाहिले.
- ^ Infosys Limited. "Contact". Infosys. 23 December 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-02-24 रोजी पाहिले.
- ^ Krishna Chaitanya, SV (6 Jan 2021). "Setback to ECR storm water drain project in Chennai as German government freezes funding". The New Indian Express. 17 May 2021 रोजी पाहिले.
- ^ "PayPal employees' initiative to support Chennai Corporation". Chennai. The Hindu. 25 November 2012. 29 November 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-11-25 रोजी पाहिले.