शेवगेडांग
?शेवगेडांग महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | इगतपुरी |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
शेवगेडांग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
सामाजिक सलोखा
हे नाशिक जिल्ह्यातील गाव असून शेवगेडांग (ता. इगतपुरी) या ठिकाणी दलित वस्तीवर हल्ला झाल्याने सध्या चर्चेत आहे.
बौद्ध वस्तीवर जातीयवादी हल्ला
येथील बौद्ध वस्तीवर झालेला जातीयवादी हल्ला म्हणजे दुसरी खैरलांजी !! या गावात गेल्या अनेक वर्षांपासून असे जाती वर्चस्वाचे खटके उडताहेत. तीनेक वर्षांपूर्वी या गावातील स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या जातीयवादी काही मराठा समाजातील तरुणांनी निळ्या झेंड्याची विटंबना केल्यापासून या घटनांना जास्त पेव फुटला आहे. सध्या या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका किरकोळ भांडणातून. एक जीप कलंडल्याने जखमी झालेल्या एका स्त्रीच्या व मुलाच्या औषधोपचाराचा अर्धा खर्च जीप ड्रायव्हरने उचलावा या मागणीचे पर्यवसन भांडणात झाले जे पोलिसांनी मिटवले.यानंतर रविवारी २० तारखेंला जातीयवादी काही मराठा समाजातील १९ तरुणांनी दुपारी चारच्या सुमारास गाव बेसावध गाठून गावातील बुद्ध बांधवांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. ट्रॅक्टर भरून दगड आणल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. बेसावध तरुण जबरी जखमी झाले, गाड्या फोडण्यात आल्या. दगडाच्या मार्याने घाबरलेल्या स्त्रिया व लहान मुलं लपून बसले. बुद्ध वस्तीतील १० जखमी तरुणांना नाशिक सिव्हील येथे नेण्यात आले, त्यातील एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला न्युरोसर्जरीसाठी केईएम येथे नेण्यात आले. या घटनेत अनेक घरातील वस्तू दरवाजे दरवाजांच्या चौकटी कवले सिमेंटचे पत्रे दुचाक्या इ.ची प्रचंड हानी झाली. बाबासाहेबांच्या फोटोंची विटंबना केली गेली.[१]नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) ह्या खेडे गावात जातीयवादातून बौद्ध वस्तीवर हल्ला करून तेथील तरुणांना सळ्यांनी आणि गजीने चोप दिला. तेथील आपल्या आया-बहिणी सध्या भयभीत अवस्थेत आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता कि जातीयवाद्यांनी लहान मुले, स्त्रिया, वायोवृद्धांना देखील सोडले नाही. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात शेवगेडांग गावी गावातीलच काही जातीयवादी गुंडांनी बौद्ध वस्तीवर शसस्त्र हल्ला केला. या हल्यामध्ये दहा बांधव गंभीर रित्या जखमी आहेत. गावगुंडानी केलेला हल्ला अतिशय भयानक होता, दगड, विटा,कोयते, तलवारी,लाठ्याकाठ्या,¬लोखंडी गज आदि प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. गावगुंडांनी बौद्धवस्तीत आपल्या घरासमोर असलेल्या दुचाकी, टीव्ही, संसारपयोगी साहित्य तसेच तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची ही मोडतोड केलेली आहे.[२]
संदर्भ
- ^ http://nrp.org.in/news.php[permanent dead link]
- ^ दै.सम्राट दि.२२/१०/२०१३