Jump to content

शेळीच्या भारतातील जाती

भारतातील बहुसंख्य शेळ्या संमिश्र जातींच्या आहेत. तथापि सर्वसाधारणपणे भारतात सुस्पष्ट अशा १३ प्रादेशिक जाती अस्तित्वात आहेत.[]


हिमालयाच्या आसपासच्या भागात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशाचा काही भाग येथे चंबा, गद्दी व काश्मीरी, पश्मिना, चेगू,

पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशाचा काही भाग या ठिकाणी जमनापारी, बीटल व बारबारी या जाती आहेत.

मध्य भारतात राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेशाच्या काही भागांत मारवाडी, मेहसाण, झेलवाडी, बेरारी व काठियावाडीया शेळ्याच्या जाती आहेत.



महाराष्ट्र, गुजरात, आंध प्रदेश, तमिळनाडू व केरळ या भागांत सुरती, दख्खनी, उस्मानाबादी व मलबारी या शेळ्यांच्या जाती आढळून येतात.

बंगाल, आसाम, त्रिपुरा, ओरिसा व बिहार राज्यात बंगाली शेळी म्हणून ओळखली जाणारी एकच जात प्रामुख्याने आढळते. आसाम मध्ये आसाम हिल ब्रीड (गोट) ही स्वतंत्र जात आहे असे मानतात.


संदर्भ

  1. ^ "शेळी". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-01-05 रोजी पाहिले.