Jump to content

शेतकरी साहित्य संमेलन

  • २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

  • २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०१५ या दोन दिवसांच्या कालावधीत वर्धा येथे १ले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष शरद जोशी होते.
  • २० आणि २१ फ़ेब्रुवारी २०१६ला दुसरे अखिल भारतीय.मराठी शेतकरी साहित्य संमेलन डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे झाले. या संमेलनाचे अध्यक्ष रावसाहेब बोराडे होते. संमेलनात कै. शरद जोशी यांना युगात्मा ही मरणोत्तर लोकउपाधी देण्यात आली. संमेलनात 'शेतकऱ्यांचा सूर्य' हा शरद जोशींवरील विशेषांक आणि 'कणसातली माणसं' व 'नागपुरी तडका' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
  • ३ रे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोलीत दिनांक २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. शेषराव मोहिते होते.
  • बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी भूषविले होते.
  • ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा लोकप्रिय शेतकरी कवी इंद्रजित भालेराव असतील.




पहा : साहित्य संमेलने