शेतकरी (मासिक)
शेतकरी मासिक हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी आयुक्तालय, पुणे येथून दरमहा प्रसिद्ध केले जाते. या मासिकाची निर्मिती वसंतराव नाईक सरकारच्या काळात सन १९६५ मध्ये झाली. कृषी विद्यापीठ स्थापनेबरोबरच शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी. कृषीसंशोधन नवप्रयोगाचे आदानप्रदान व्हावे. अशा व्यापक शेतकरी हितातून हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी सन १९६५ मध्ये 'शेतकरी' मासिकाला उदयास आणले. कृषी व कृषीसंलग्न विषयाशी निगडित माहितीपर लेख कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, कृषी खात्यांचे अधिकारी, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच अनुभवी शेतकरी यांचेकडून प्राप्त करून घेऊन प्रसिद्ध केले जातात. 'शेतकरी' मासिकात कृषी, जलसंधारण व पशुसंवर्धन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगाची ओळख होत असून विविध यशोगाथा देखील यात प्रसिद्धीस येते. राज्यातील शेतकऱ्याना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची तसेच कृषीविषयक झालेल्या संशोधनाची माहिती या मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी पुरविली जाते.
हे मासिक कृषी विभागाच्या संकेतस्थळावर वाचण्यास उपलब्ध आहे, मासिक वाचण्याकरीता खालील लिंकवर जा -
http://mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx Archived 2017-11-28 at the Wayback Machine.