शेखर नवरे
शेखर नवरे | |
---|---|
जन्म | शेखर नवरे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | वेटिंग फॉर गोदो |
प्रमुख चित्रपट | श्यामचे वडील |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | संस्कार |
शेखर नवरे (जन्म : इ.स. १९५८; मृत्यू :मुंबई, ११ झानेवारी, इ.स.२०१६) हे एक मराठी अभिनेता होते. व्यवसायाने ते मानसोपचार डॉक्टर होते.
‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकात शेखरने टॉम अल्टर, अरुण होर्णेकर आणि दिलीप खांडेकर यांच्या सोबत काम केले होते. या नाटकातल्या त्यांच्या भूमिकेचे नाट्यसृष्टीत खूप कौतुक झाले होते. ते उत्तम कलाकार तर होतेच, पण उत्तम मित्रसुद्धा होते. नाटकाविषयी त्यांना खूप आत्मीयता होती. अभिनय क्षेत्रात येण्याआधी ते बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते; परंतु अभिनयावरच्या प्रेमामुळे त्यांनी कलेच्या क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.
शेखर नवरे यांची भूमिका असलेली नाटके
- अश्वमेध
- आणि अचानक
- आंदोलन (भूमिका आणि निर्मिती)
- एक होता शहाणा
- कोंडा (भूमिका आणि निर्मिती)
- गिधाडे
- तू फक्त हो म्हण
- धर्मपत्नी
- मार्ग सुखाचा
- राजा इडिपस
- वेटिंग फॉर गोदो
- सई परांजपे यांचे ‘आया अफसर’ (हिंदी नाटक)
शेखर नवरे यांची भूमिका असलेले चित्रपट
- इरसाल कार्टी
- कुलदीपक
- खरा वारसदार
- गडबड घोटाळा
- ताकद (हिंदी)
- धाकटी सून
- पुढचं पाऊल
- माझं काय चुकलं
- श्यामचे वडील
- सिंहासन
शेखर नवरे यांच्या भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
- अधिकारी बंधूंच्या अनेक मालिका
- अस्मिता
- कथा गंगेच्या धारा
- घर
- संस्कार (भूमिका आणि निर्मिती)
शेखर नवरे यांची निर्मिती असलेली दूरचित्रवाणी मालिका
- संस्कार