Jump to content

शॅल वी टेल द प्रेसिडेंट

शॅल वी टेल द प्रेसिडेंट हे इंग्रजी लेखक जेफ्री आर्चर यांचे १९७७ मधील पुस्तक आहे.

या पुस्तकाच्या मूळ आवृत्तीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड केनेडी यांना जीवे मारण्याचा डाव एफ बी आय प्रमुखासोबत काम करणाऱ्या एका एफ बी आय एजन्टकडून हाणून पाडला जातो, अशी कथा आहे. पुस्तकातील एक प्रेमप्रकरण, एकूण कथानकातील गुंतागुंत वाढवते. या पुस्तकात वॉशिंग्टनच्या सरकारी कार्यपद्धतीचे वर्णनात्मक तपशील असून त्यांचे संदर्भही लेखक देतो. ’केन ॲन्ड एबल’ व ’द प्रॉडिगल डॉटर’च्या यशानंतर या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीत केनेडींऐवजी फ्लोरेन्टिना केनची व्यक्तिरेखा राष्ट्राध्यक्ष म्हणून वापरली आहे. यात भूतपूर्व सेनेटर बील ब्रॅड्ली हे उपराष्ट्राध्यक्ष असून त्यांचे पात्र सतत शेक्सपियरच्या ज्युलिअस सीझरचा उल्लेख करीत असते. मूळ आवृत्तीत डेल बंपर्स (भूतपूर्व सेनेटर) हे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून होते.