Jump to content

शूर्पणखा

रामाला स्वतःच्या मोहपाशात पाडू पाहणारी शूर्पणखा (निर्मितिकाळ: इ.स. १९१६ ; चित्रकार: भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी)

शूर्पणखा (संस्कृत: शूर्पणखा तमिळ: சுற்பனக்ஹா, सूर्पनकै; भासा इंडोनेशिया: Sarpakenaka, सार्पाकनका; भासा मलायू: Surapandaki, सुरपंदकी ; थाई: सम्मनखा) ही रामायणात वर्णिलेली एक राक्षसी होती. ही ऋषी विश्रवा व त्याची द्वितीय पत्नी कैकसी यांची कन्या व रावणाची बहीण होती. ही वनवासात असलेल्या सीतेला त्रास देऊ लागली आणि रामाला मोहात पाडायचा प्रयत्‍न करू लागली, म्हणून लक्ष्मणाने रामाच्या आज्ञेवरून हिचे नाक-कान कापून तिला विद्रूप केले. स्वतःच्या या अवमानाचा सूड घेण्यासाठी हिने रावणास राम-सीता व लक्ष्मण यांविरुद्ध फितवले. त्यामुळे रावणाने सीतेस पळवून नेले आणि पुढे सारे रामायण घडले.