Jump to content

शून्य गुरुत्वाकर्षणातील होणारे शारीरिक बदल

शून्य गुरुत्वाकर्षणातील होणारे शारीरिक बदल.

अंतराळवीर जेव्हा अंतराळात जातात तेव्हा तेथे गुरुत्वाकर्षण विरहीत वातावरण असते. अशा वातावरणात राहण्याचे प्रशिक्षण त्यांना नासाच्या केंद्रातून मिळते. शून्य गुरुत्वाकर्षणाचा मेंदूवर परिणाम होऊन मेंदूचे इतर अवयवांवरील नियंत्रण शिथिल होते. म्हणूनच मेंदूच्या हालचालींचा या काळात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी शुक्ष्म यंत्रे असलेले शिरस्त्राण केलेले असते. हे शिरस्त्राण डोक्यावर घालून मगच काम करावे लागते. शून्य गुरुत्वाकर्षण ही एक निराळीच अवस्था असून अंतराळवीरांच्या शिरिरावरील प्रत्येक अवयवावर त्याच्या परिणाम होतो.