Jump to content

शू चीमो

शू चीमो (देवनागरी लेखनभेद: ह्सू चीमो; पारंपरिक चिनी लिपी: 徐志摩 ; पिन्यिन: Xú Zhìmó;) (जानेवारी १५, १८९७ - नोव्हेंबर १९, १९३१) हा चिनी भाषेतील इ.स.च्या विसाव्या शतकातला प्रभावशाली कवी होता. प्रेम, सौंदर्य, स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या त्याच्या कवितांनी चिनी काव्यपरंपरेला आधुनिक वळण दिले.

जीवन

चीनमधील चेज्यांग प्रांतात जानेवारी १५, १८९७ रोजी जन्मलेल्या शूने अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, तर इंग्लंडातील किंग्ज कॉलेज, केंब्रिज या संस्थांतून उच्चशिक्षण घेतले. इंग्लंडात असताना तेथील कीट्स व शेली या कवींच्या कवितांचा व समकालीन फ्रेंच कवींच्या कवितांचा प्रभाव त्याच्यावर पडला. या प्रभावातून त्याच्या चिनी कवितांना आधुनिकतेची प्रेरणा मिळाली असावी.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत