शुभा खोटे
शुभा खोटे | |
---|---|
शुभा खोटे | |
जन्म | शुभा खोटे ३० ऑगस्ट, १९३७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
पुरस्कार | गंगा जमुना पुरस्कार |
पती | [१] |
अपत्ये | भावना बलसावर |
नातेवाईक | दुर्गा खोटे(चुलती) विजू खोटे(भाऊ) |
शुभा खोटे (३० ऑगस्ट, १९३७ - ) ह्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अभिनेत्री असून त्यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील चित्रपटात व दूरचित्रवाहिनी मालिकात काम केले आहे.[१]
कारकीर्द
पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांची मोठी कारकीर्द आहे. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले. त्यानंतर त्याची कारकीर्द चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून गाजली.
क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या शुभा खोटे यांना एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी १९५५ साली त्यांना ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटात शुभा खोटे कॉलेज कन्यकेचे काम केले. 'पेईंग गेस्ट’या चित्रपटात त्यांनी खलनायिका होती. मेहमूद, शुभा खोटे आणि धुमाळ हे ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके अनेक चित्रपटात काम केले. शुभा खोटे आणि मेहमूद यांची प्रेमकथा आणि शुभाच्या वडिलांच्या भूमिकेत धुमाळ अशी त्यांची कामे असत.
चित्रपट
- एक दूजे के लिये
- चिमुकला पाहुणा (मराठी चित्रपट)
- छोटी बहन
- जिद्दी
- दिल एक मंदिर
- दिल तेरा दिवाना
- पेईंग गेस्ट
- भरोसा
- ससुराल
- सीमा