शुचौ
शुचौ 徐州市 | |
चीनमधील शहर | |
शुचौ | |
देश | चीन |
प्रांत | च्यांग्सू |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ५१४ |
क्षेत्रफळ | ११,२५९ चौ. किमी (४,३४७ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ८५,७७,२२५ |
- घनता | ७६० /चौ. किमी (२,००० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
शुचौ (देवनागरी लेखनभेद : शुझोऊ चिनी: 徐州市, प्राचीन नाव: पेंगचेंग) हे चीन देशातील पूर्वेच्या ज्यांग्सू प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर चीनच्या पूर्व भागात राष्ट्रीय राजधानी बीजिंगच्या किमी दक्षिणेस तर ज्यांग्सू प्रांताची राजधानी नांजिंगच्या ३३० किमी उत्तरेस वसले आहे. २०१८ साली शुचौ महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती.
प्राचीन इतिहास असलेले शुचौ हान राजवंशाच्या प्रमुख शहरांपैकी एक होते. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकामध्ये चू राजतंत्राच्या राजधानीचे ठिकाण येथेच होते. आजही येथे हान राजवंशाच्या अनेक खुणा आढळतात. पूर्व व उत्तर चीनला जोडणाऱ्या प्राचीन मार्गावर स्थित असल्यामुळे शुचौ एक महत्त्वाचे वाणिज्य व व्यापार केंद्र राहिले आहे. १९३८ सालच्या दुसऱ्या चीन-जपान युद्धामधील शुचौच्या लढाईमध्ये जपानी साम्राज्याने चीनच्या प्रजासत्ताकाला पराभूत करून ह्या शहरावर ताबा मिळवला होता.
वाहतूक
शांघाय व बीजिंग ह्या चीनमधील दोन प्रमुख शहरांच्या मध्ये स्थित असल्यामुळे शुचौ शहर एक मोठे वाहतूककेंद्र बनले आहे. बीजिंग-शांघाय एक्सप्रेसवे शुचौमधूनच धावतो. तसेच बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेमार्गावरील सुचौ हे एक वर्दळीचे स्थानक असून येथून चीनच्या अनेक शहरांसाठी द्रुतगती रेल्वे गाड्या सुटतात. शुचौ-झेंगचौ-शीआन-लानचौ-उरुम्छी हा ३,४२२ किमी लांबीचा द्रुतगती रेल्वेमार्ग येथूनच सुरू होतो. शुचौ ग्वान्यिन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिव्हॉयेज वरील शुचौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-08-05 at Archive.is (चिनी भाषेत)