Jump to content

शीव पनवेल महामार्ग

शीव पनवेल महामार्ग
शीव पनवेल मार्गाचा नकाशा
मार्ग वर्णन
देशभारत ध्वज भारत
लांबी २५ किलोमीटर (१६ मैल)
सुरुवात शीव
प्रमुख जोडरस्तेपूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, पाम बीच रस्ता, मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४
शेवटकळंबोली
स्थान
शहरेमुंबई, नवी मुंबई, पनवेल
जिल्हेमुंबई उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा
राज्येमहाराष्ट्र


शीव पनवेल महामार्ग (Sion Panvel Highway) हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. २५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग पूर्व-पश्चिम धावतो व मुंबई शहराला नवी मुंबईपनवेल शहरांसोबत जोडतो. कळंबोली येथे हा महामार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत जोडला गेला असल्यामुळे पुणे व दक्षिणेकडील सर्व शहरांना मुंबईसोबत जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याचसोबत पनवेलमार्गे कोकणगोवा देखील ह्याच मार्गाने मुंबईसोबत जोडले गेले आहे. हा महामार्ग मुंबईच्या शीव, चेंबूर, अणुशक्ती नगर, मानखुर्द तर नवी मुंबईच्या वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरूळ, सी.बी.डी. बेलापूर, खारघर, कामोठेकळंबोली ह्या उपनगरांना जोडतो.

महाराष्ट्रामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक असलेल्या शीव पनवेल महामार्गावरील वाहतूकीची कोंडी हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या मार्गाचे रूंदीकरण व काँक्रीटीकरण केले ज्यासाठी ₹ १७०० कोटी इतका प्रचंड खर्च आला. हा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने येथे पथकर (टोल) आकारण्याचा निर्णय घेतला व ६ जानेवारी २०१५ पासून ह्या महामार्गावर मोटार गाड्यांना एकेरी प्रवासासाठी ₹३० इतका टोल भरावा लागतो.