शीला कौल
शीला कौल (७ फेब्रुवारी, इ.स. १९१५ - १३ जून, इ.स. २०१५) या भारताच्या माजी मंत्री आणि हिमाचल प्रदेशाच्या राज्यपाल होत्या. इंदिरा गांधी यांच्या त्या मामी होत्या.
शीला कौल यांचे शिक्षण लाहोर येथून झाले. त्या बी.ए.बी.टी होत्या.
त्यांच्या पतीचे नाव कैलाशनाथ कौल होते. ते वनस्पतिशास्त्रज्ञ होते. उत्तर प्रदेश राज्याच्या माजी माहिती आणि प्रसारण मंत्री दीपा कौल ही शीला कौल यांची कन्या आणि माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी गौतम कौल व आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशासक विक्रम कौल हे त्यांचे दोन पुत्र आहेत.
वयाच्या १०१व्या वर्षी गाझियाबाद येथे शीला कौल यांचे निधन झाले.
शीला कौल यांची राजकीय कारकीर्द
- भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समाजकल्याण खात्याच्या राज्यमंत्री (१९८२-१९८९)
- युनेस्कोतील सहभागासाठी निर्माण केलेल्या भारतीय राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष (१९८२-१९८९)
- केंद्रीय मंत्रिमंडळात नागरी विकास आणि रोजगार मंत्री (१९९५)
- हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल (१९९५-१९९६)