Jump to content

शीबा चड्ढा

Sheeba Chaddha (es); شیبا چڈھا (ks); Sheeba Chaddha (ast); Шиба Чадха (ru); शीबा चड्ढा (mai); Sheeba Chaddha (sq); شبا چادها (fa); 希巴·查达 (zh); شیبا چڈھا (ur); Sheeba Chaddha (tet); شيبا تشادها (arz); Sheeba Chaddha (ace); 席芭・查達 (zh-hant); शीबा चड्ढा (hi); షీబా చద్దా (te); ਸ਼ੀਬਾ ਚੱਡਾ (pa); Sheeba Chaddha (map-bms); Sheeba Chaddha (it); শীবা চাড্ডা (bn); Sheeba Chaddha (fr); Sheeba Chaddha (jv); शीबा चड्ढा (mr); Sheeba Chaddha (bjn); Sheeba Chaddha (sl); Sheeba Chaddha (id); Sheeba Chaddha (nl); Sheeba Chaddha (min); Sheeba Chaddha (su); Sheeba Chaddha (bug); Sheeba Chaddha (gor); Sheeba Chaddha (de); شبا چادها (azb); Sheeba Chaddha (en); Sheeba Chaddha (ga); Sheeba Chaddha (ca); シェーダ・チャッダ (ja) actriz india (es); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); actriu índia (ca); actores a aned yn 1973 (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر هندی (fa); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); indisk skådespelare (sv); індійська акторка (uk); 印度女演員 (zh-hant); भारतीय अभिनेत्री (hi); intialainen näyttelijä (fi); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); Indian actress (en); actriz indiana (pt); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (nl); actriz india (gl); שחקנית הודית (he); индийская актриса (ru); Indian actress (en); ممثلة هندية (ar); indische Film-, Fernseh- und Theaterschauspielerin (de); Indian actress (en-gb) シェーバ・チャッダ (ja)
शीबा चड्ढा 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९७३
दिल्ली
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९८
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शीबा चड्ढा (जन्म १९६३) एक भारतीय चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत.[] त्यांना २०२२ मधील बधाई दो आणि डॉक्टर जी या चित्रपटांमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांनी बधाई दो चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला.[][]

सुरुवातीचे जीवन आणि करकीर्द

चड्ढा दिल्लीत लहानाच्या मोठ्या झाल्या, जिथे त्यांना नाटकामध्ये रस निर्माण झाला आणि त्यांनी नाटकाचा अभ्यास सुरू केला.[] त्यांनी हंसराज कॉलेज (दिल्ली विद्यापीठ) मधून इंग्रजी साहित्यात शिक्षण घेतले.[] त्या अनुराग कश्यपसोबत वर्गमित्र होत्या.

चड्ढा यांनी हम दिल दे चुके सनम (१९९९), परजानिया (२००७), दिल्ली ६ (२००९), लक बाय चान्स (२००९) आणि तलाश (२०१२) यांसारख्या चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम केले आहे. [] २०११ मध्ये, त्या अभिनेता ऋतुराज सिंगसोबत, प्रकता हेत याड या लघुपटातही दिसल्या. रिव्हर टू रिव्हर या फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये लघुपट प्रकारात या चित्रपटाला ऑडियन्स चॉइस पुरस्कार मिळाला.[] त्या २०१२ मध्ये तलाश: द आन्सर लाईज विदीन मध्ये निर्मलाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. २०१५ मध्ये शरत कटारियाच्या दम लगा के हैशामध्ये नैन तारा तिवारी (बुआजी) म्हणून त्यांनी काम केले.

दूरचित्रवाणीवर त्यांचे सुरुवातीचे काम हे लव्ह मॅरेज (२००२) मध्ये होते, ज्यानंतर त्यांनी २००७ मध्ये कस्तुरीमध्ये एका बिझनेस टायकूनच्या भूमिकेत दूरचित्रवाणीवर पुनरागमन केले.[] यानंतर ना आना इस देस लाडो (२००९-१२), कितनी मोहब्बत है (२००९), कहानी सात फिरों की (२००७), कुछ तो लोग कहेंगे (२०११-१३) आणि लाखों में एक (२०१२) सारख्या त्यांच्या अनेक मालिका आल्या.[] जून २०१२ मध्ये, त्या झी टीव्हीवरील हिटलर दीदी या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेच्या कलाकारांमध्ये सामील होत्या.[]

त्यांनी रजत कपूरच्या सी फॉर क्लाउन (२००७) या नाटकात काम केले.[] मुनीष भारद्वाज, विनय पाठक, कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरे यांच्यासोबत अतुल कुमारचा द ब्लू मग (२०१०) या नाटकामध्येही त्यांनी काम केले आहे.[] रॉयस्टेन एबेलच्या ऑथेलो इन ब्लॅक अँड व्हाईट मध्ये डेस्डिमोना (ऑथेलोची बायको) या प्रमुख भूमीकेत त्या होत्या. २०१२ मध्ये हेन्रिक इब्सेनच्या हेड्डा गॅबलर या नाटकात त्यांनी हेड्डाची मुख्य भूमिका केली होती.[] मुंबईत ‘द कंपनी थिएटर’ हा नाटक गट चालवण्यातही त्यांचा सहभाग आहे.[] त्या द व्हायरल फीव्हर (TVF) च्या बॅनरखाली असलेल्या परमनंट रूममेट्स या इंटरनेट दूरचित्रवाणी मालिकेत आहे.

फिल्मोग्राफी

अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपट/शो/मालिका दर्शवते

चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिका
१९९८ दिल से..मोईनाची बहीण
१९९९ हम दिल दे चुके सनमअनुपमा त्रिपाठी
२००० फिर भी दिल है हिंदुस्तानीजुही आनंद
२००२ काली सलवाररुखसाना
२००३ जिस्मशीबा
इन ऑथेलोकरीना
२००४ एक हसीना थीशिल्पा शर्मा
मर्डरनर्गिस
२००७ परझानियाअनामिका
२००९ दिल्ली ६रज्जो
लक बाय चान्सकविता
२०१० वेस्ट इज वेस्टरेहाना खान
२०११ झोक्कोमोनराजराणी
२०१२ लव्ह यू टू डेथमाया कुमारी
तलाशनिर्मला
२०१५ दम लगा के हईशानयनतारा
२०१७ रईसअमिना आलम
इंदू सरकारमेखला
व्हॉट वील पिपल सेअर्चना भोसले
२०१८ राजमा चाळनीतू
रेडप्रभा देवी
बधाई होसंगीता शर्मा
झीरोबीना सिंग
२०१९ गल्ली बॉयझोया फिरदौसी
जबरिया जोडीबीना सिंग
बेबाकशीला
२०२० शकुंतला देवीताराबाई
२०२१ हाती मेरे साथीन्यायाधीश इमरती
पॅग्ग्लिटउषा [१०]
२०२२ बधाई दोमीनाक्षी [११]
मजा मापम्मी हंसराज
शर्माजी नमकीनआरती शर्मा
फोन भूतचिकनी चुडैल
खुदा हाफिज २शीला ठाकूर [१२]
डॉक्टर जीशोभा गुप्ता [१३]
२०२३ राबिया ॲन्ड ऑलिव्हियाराबियाची आई
ट्रायल पिरेडमामीजी
द टेनंटश्रीमती मिश्रा
२०२४ ऑल इंडिया रॅन्क

दूरदर्शन

वर्ष कार्यक्रम भूमिका
१९९८ - २००१हिप हिप हुर्रे
१९९९-२०००गुब्बरेअनु
२००२लव्ह मॅरेजसोनाली
२००७कस्तुरी
२००९-१२ना आना इस देस लाडो
२००९कितनी मोहब्बत है
२००९कहानी सात फेरों की
२०११-१३कुछ तो लोग कहेंगे[]
२०१२हिटलर दीदीदुलारी बुवा
२०१२लाखों में एक
२०१३-१४पवित्र रिश्ता
२०१५हॅलो प्रतिभापुष्पा चाची

वेब सिरीज

वर्ष कार्यक्रम भूमिका
ऐसा वैसा प्यारसुनीता
२०१४परमनंट रूममेट्सलता चौधरी
२०१८मिर्झापूरवसुधा पंडित
२०२०बंदिश बॅन्डीटमोहिनी
२०२०ताजमहाल १९८९"मुमताज

पुरस्कार

  • २०१२ - ना आना इस देस लाडो - इंडियन टेली पुरस्कार नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नामांकन
  • २०२१ - बंदिश बॅन्डीट - फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार - नामांकन
  • २०२३ - बधाई दो - फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार - विजेता[१४]
  • २०२३ - डॉक्टर जी - फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार - नामांकन
  • २०२३ - डॉक्टर जी - झी सिने पुरस्कार सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी (महिला) - नामांकन

संदर्भ

  1. ^ a b Dipti Nagpaul D'souza (15 March 2012). "Language no bar". 15 July 2013 रोजी पाहिले. ..renowned theater artiste Sheeba Chaddha
  2. ^ "Nominations for the 68th Hyundai Filmfare Awards 2023 with Maharashtra Tourism". Filmfare. 24 April 2023. 24 April 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Winners of the 68th Hyundai Filmfare Awards 2023". Filmfare. 28 April 2023. 28 April 2023 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "Sheeba's brotherly love!". The Times of India. 6 October 2011. 17 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2013 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Sheeba Chadha — artist details". MumbaiTheatreGuide. 15 July 2013 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Essaying conflicts". 11 February 2010. 17 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2013 रोजी पाहिले.
  7. ^ a b Kimi Dangor (11 June 2007). "Back with a bang: Sheeba Chadha". India Today. 15 July 2013 रोजी पाहिले.
  8. ^ "Sheeba Chaddha enters Hitler Didi". Sify.com News. 19 June 2012. 17 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2013 रोजी पाहिले.
  9. ^ Piyasree Dasgupta (31 March 2010). "Memory Central". 15 July 2013 रोजी पाहिले.
  10. ^ Kambam, Saichaitanya (16 September 2020). "Netflix picks up "Pagglait" starring Sanya Malhotra and Shruti Sharma". OnlyTech. 16 September 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "Sheeba Chadha opens up on playing a mother in Rajkummar Rao and Bhumi Pednekar's Badhaai Do". Pinkvilla. 7 May 2021. 6 September 2021 रोजी पाहिले.
  12. ^ "Khuda Haafiz Chapter 2 Agnipariksha trailer: Vidyut Jammwal stars in actioner inspired by Taken, watch". Indian Express. 8 June 2022. 8 June 2022 रोजी पाहिले.
  13. ^ "Ayushmann Khurrana Celebrates Film Wrap With This Oh-So-Cute Cake". NDTV Food. 5 September 2021. 6 September 2021 रोजी पाहिले.
  14. ^ "Nominations For The 68th Hyundai Filmfare Awards 2023 With Maharashtra Tourism". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2023-06-08 रोजी पाहिले.