Jump to content

शिस्त


व्याख्या

मराठी शाब्दबंधाच्या व्याख्येनुसार,वागण्याची ठरवून दिलेली पद्धत म्हणजे शिस्त होय.[] तर,स्वयंशिस्त या विषयाचे लेखक प्रा.संजय नाईक यांच्या मतानुसार शिस्त म्हणजे,बिनचूक आणि विवक्षित पद्धतीनुसार वर्तन होय.[] एखाद्या व्यक्तीशी नीट, सोईस्कर आणि आदराने बोलणे, वागणे म्हणजे शिस्त होय.

संकल्पनेची व्याप्ती

एखाद्या व्यक्तीस पद्धतशीरपणे देण्यात येणाऱ्या सूचना/आदेश/प्रशिक्षण ह्या शिस्त प्रकारात मोडतात.त्यात विशिष्ट आदेशांची अंमलबजावणीही शिस्तीत मोडते. एखाद्या कारगिरीत, व्यापारात किंवा इतर कोणत्याही क्रियांत, त्या सुरळीतपणे चालाव्यात यासाठी, शिस्त लागू केली जाऊ शकते. शिस्तीत विशिष्ट वागणूकीचाही अंतर्भाव असू शकतो. लागू केलेल्या नियमांचे पालन म्हणजे शिस्त असेही म्हणता येते. शिस्त पाळण्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व त्यात कठोरपणा आणण्यासाठी, ती मोडल्यास एखादी शिक्षापण दिली जाते. शिस्तीचे पालन केल्याने, अनेक मोठी ध्येये गाठण्यास मदत होते.

शिस्तपालनामुळे वैयक्तिक सोईसुविधांवर प्रभाव पडत असला तरी त्यात ध्येयनिश्चिती नक्कीच असते. शिस्तीमुळे इच्छाशक्ती वाढते. स्वयं-नियंत्रण हा शिस्तचा पर्यायी शब्द समजला जातो. गुणात्मक वागणुकीने बऱ्याच गोष्टी साध्य होतात.

विचारप्रक्रिया संकल्पना

मराठी विश्वकोशात मे. पुं. रेगे यांच्या मतानुसार तार्किक विचारप्रक्रिया नियंत्रित असते. जी समस्या सोडविण्यासाठी तार्किक विचारप्रक्रिया चालू असते, तिचे नियंत्रण त्या विचारप्रक्रियेवर असते. जी समस्या सोडवायची असेल, तिच्याशी कोणत्या तरी प्रकारे संबंधित असलेली माहिती उपलब्ध माहितीतून निवडून तिचा वापर करावा लागतो. इतर माहिती वर्ज्य करावी लागते. तार्किक विचारप्रक्रियेला एक प्रकारची शिस्त असते; मनोराज्य रंगविण्यात ही शिस्त नसते.[]

सामाजिकरण संकल्पना

मराठी विश्वकोशातील सामाजिकरण लेखाचे लेखक किरण केंद्रे यांच्या मतानुसार "समाजाच्या अपेक्षांनुसार स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवून वागणे म्हणजे शिस्तबद्घ वर्तन होय."[] किरण केंद्रे यांच्या व्याख्येची मर्यादा मराठी विश्वकोशात मे. पुं. रेगे,बर्ट्रंड रसेल यांना उद्धृत करताना येते "चांगला नागरिक म्हणजे राज्यसंस्था, धर्मसंस्था आणि समाजाचे नियमन करणाऱ्या इतर संस्था जी शिस्त घालून देतात, ती निमूटपणे पाळण्याची सवय असलेला नागरिक, अशी कल्पना आहे. अशी शिस्त म्हणजे केवळ मानसिक गुलामगिरी होय असे रसेल यांचे म्हणणे आहे. शिक्षणाचे ध्येय चांगला माणूस बनविणे हे असले पाहिजे, चांगला नागरिक बनविणे हे नव्हे. "[]

व्यवस्थापन संकल्पना

शिस्तबद्ध संघटना चांगले काम करू शकते. संघटनेत शिस्त जोपासणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते. व्यवस्थापनकार्यात सर्व कर्मचाऱ्यांकडून शिस्तबद्ध आचरणाची अपेक्षा असते.[][] डग्लस मॅकग्रेगॉर या अमेरिकन तज्ज्ञाने Douglas McGregor The Human Side Of Enterprise नावाच्या ग्रंथात थिअरी X आणि थिअरी Y अशा दोन प्रेरणांचे प्रतिपादन केले आहे. थिअरी X व्यक्तींना मूलत: कामाचा कंटाळा असतो आणि जबाबदारी घेण्याचा अभाव दर्शवून शिस्तीचे उद्दिष्ट साधण्यासाठी शिक्षेचा वापर सुचवते. थिअरी Y व्यक्तीची प्रोत्साहनाची प्रेरणा जागृत करून शिस्तीचे उद्दिष्ट साध्य करता येते असे सुचवते.[]

स्वयंशिस्त

स्वतःहून स्वतःवर लागू केलेल्या नियमांना स्वयंशिस्त म्हणतात. आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत. असं म्हणतात की मानव हा अतिशय हुशार प्राणी आहे, पण जर आपण मुंग्यांना पाहिले तर आपल्या पेक्षा जास्त हुशार ते दिसतात. कारण आपण चालताना कधीच शिस्त पाळत नाही, पण मुंग्यांची, जरी आपण मोडली तरी ते पुन्हा व्यवस्थित रांग करून जातात.

सैन्य व पोलीस दलातील शिस्त

सैनिक आणि पोलीस हे अतिशय कठोर शिस्त पाळतात. सैनिकांना ऊन असो, वारा असो वा पाऊस असो, ते आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी उभे असतात. एवढी त्यांच्या मध्ये शिस्त आहे.

संदर्भ

  1. ^ [http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php मराठी शाब्दबंध संकेतस्थळ व्याख्या जशी भाप्रवे १२ नोव्हेंबर २०१३ दुपारी १४ वाजून ३० मिनीटांनी जशी अभ्यासली
  2. ^ संपूर्ण यशासाठी स्वयंशिस्त -लेखक प्रा. संजय नाईक हा ग्रंथ बुकगंगा डॉट कॉम संकेतस्थळावर व्याख्या जशी भाप्रवे १२ नव्हेंबर २०१३ दुपारी १४ वाजून ३० मिनिटांनी जशी अभ्यासली
  3. ^ मराठी विश्वकोशातील विचारप्रक्रिया लेखाचे लेखक मे. पुं. रेगे मराठी विश्वकोश संकेतस्थळावर व्याख्या जशी भाप्रवे १२ नोव्हेंबर २०१३ दुपारी १४ वाजून ३० मिनिटांनी जशी अभ्यासली
  4. ^ मराठी विश्वकोशातील सामाजीकरण लेखाचे लेखक किरण केंद्रे मराठी विश्वकोश संकेतस्थळावर व्याख्या जशी भाप्रवे १२ नोहेंबर २०१३ दुपारी १४ वाजून ३० मिनिटांनी जशी अभ्यासली
  5. ^ मराठी विश्वकोशात मे. पुं. रेगे,बर्ट्रंड रसेल यांना उद्धृत करताना] मराठी विश्वकोश संकेतस्थळावर व्याख्या जशी भाप्रवे १२ नव्हेंबर २०१३ दुपारी १४ वाजून ३० मिनीटांनी जशी अभ्यासली
  6. ^ मराठी विश्वकोशात व्यवसाय व्यवस्थापन लेखात लेखक जयवंत चौधरी मराठी विश्वकोश संकेतस्थळावर व्याख्या जशी भाप्रवे १२ नोव्हेंबर २०१३ दुपारी १४ वाजून ३० मिनिटांनी जशी अभ्यासली
  7. ^ मराठी विश्वकोशात व्यवस्थापनशास्त्र लेखात लेखक जयवंत चौधरी आणि विद्याधर भाटे यांनी आंरीफेयॉल या फ्रेंच व्यवस्थापन तज्ज्ञाचे उद्धृत केलेले मत. मराठी विश्वकोश संकेतस्थळावर व्याख्या जशी भाप्रवे १२ नोव्हेंबर २०१३ दुपारी १४ वाजून ३० मिनिटांनी जशी अभ्यासली
  8. ^ http://www.businessballs.com/mcgregor.htm संकेतस्थळावर व्याख्या जशी भाप्रवे १२ नोव्हेंबर २०१३ दुपारी १४ वाजून ३० मिनिटांनी जशी अभ्यासली