Jump to content

शिवूर (वैजापूर)

शिवूर हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक मोठे गाव आहे. या गावात वारकरी संप्रदायच्या अनेक संताच्या समाध्या आहेत. संत निळोबारायांचे शिष्य संत शंकरस्वामी महाराज, तुकारामाच्या शिष्या संत बहिणाबाई, त्याचप्रमाणे संत शिवाई माता, संत रंगनाथ स्वामी महाराज भिंगारे अशा अनेक संतांचा पदस्पर्श या गावाला आहे. रावणाने ज्या ठिकाणी तप करून शंकराला प्रसन्न केले, असे सांगितले जाते ते पुरातन श्री रावणेश्वर मंदिरही या गावात आहे.

शिवूर हे गाव ऐतिहासिक गाव आहे. पूर्वी या गावाला बारा वेशी होत्या, म्हणून याला बारा पाडाचे शिवूर असे देखील म्हणतात. गावाचे पुरातन नाव शिवपुरी असे होते या गावाच्या जवळच काकुला येथे शिवपुरी आश्रम आहे, तो संत जनार्दनस्वामी (मौनगिरी महाराज) यांचा आहे. संत जनार्दनस्वामी यांनी तेथे अनेक दिवस वास्तव केले होते. या गावात वर्षातील बाराही महिने सतत धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल चालू असते.