Jump to content

शिवाजी द्वितीय


छत्रपती शिवाजीराजे राजारामराजे भोसले
छत्रपती
कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ१७१० - १७१४
राज्याभिषेक२ सप्टेंबर १७१०
राज्यव्याप्तीकोल्हापूर संस्थान
राजधानीकोल्हापूर
पूर्ण नावछत्रपती शिवाजीराजे राजारामराजे भोसले
जन्म९ जून १६९६
जिंजी, तामिळनाडू
मृत्यू४ मार्च १७२६
कोल्हापूर, महाराष्ट्र
पूर्वाधिकारीपद निर्माण
राजमाताताराबाई भोसले
उत्तराधिकारीछत्रपती संभाजी द्वितीय
वडीलछत्रपती राजाराम महाराज
आईमहाराणी ताराबाई
पत्नीमहाराणी भवानीबाई
संततीरामराजे छत्रपती
राजघराणेभोसले
राजब्रीदवाक्यहर हर महादेव

दुसरे शिवाजी किंवा शिवाजी राजाराम भोसले (जून ९, १६९६ - मार्च ४, १७२६) मराठ्यांचे छत्रपती थोरले राजाराम आणि त्यांची जेष्ठ पत्नी महाराणी ताराबाई यांचे पुत्र होते. थोरल्या राजाराम महाराजांचा मृत्यूनंतर, दुसऱ्या शिवाजी महाराजांना १७०० मध्ये त्यांची आई ताराबाईंनी राजमाता म्हणून कारभार पाहून मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून स्थापित केले. त्यांचे चुलत भाऊ, छत्रपती थोरले शाहू हे १७०७ मध्ये मुघलांच्या तावडीतून सुटून आले तेव्हा ताराबाईंनी त्यांचा सिंहासनाचा वारसाचा हक्क धुडकावून आव्हान दिले. त्यामुळे मराठा साम्राज्याचे कोल्हापूर व सातारा असे दोन तुकडे झाले. शिवाजी द्वितीय ने १७१० ते १७१४ पर्यंत कोल्हापूरचा राजा म्हणून सेवा केली. त्या वेळी सावत्र आई राजासबाईने बंड केले आणि कोल्हापूर सिंहासनावर स्वतःचा पुत्र दुसऱ्या संभाजीला बसवले.