Jump to content

शिवलेणी

शिवलेणी, अंबाजोगाई

शिव लेणी (जोगाई मंडप; हत्तीखाना) ह्या महाराष्ट्र राज्यातल्या, अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील हिंदू गुफा आहेत.[] या संपूर्ण लेणी, त्या काळी मालवा प्रांत असे नाव असलेल्या आणि परमार वंशातील राजा उदयादित्याच्या (कारकीर्द : इ.स. १०६० ते १०८७) राजवटीत टेकडीच्या आत खोदून त्यातील दगडांवर कोरीवकाम करून बनविण्यात आली. या लेणीमध्ये हिंदू पुराणांतील गोष्टींचे वर्णन करणाऱ्या व शिव, नंदी, गणेश व इतर देवांच्या आणि देवींचा समावेश असलेल्या ह्या हिंदू कलाकृती आहेत.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार या लेण्यांतील शिल्पे व शिलालेख "अस्तित्वात असलेली भारतीय कलेचे सर्वोत्तम उदाहरण" आहेत.


या शिव लेणी पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या पुरातन वारसा (हेरिटेज) जागांमध्ये सामील आहेत. महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या अधीन, महाराष्ट्र पुरातन स्मारके आणि पुरातत्त्व जागा आणि अस्तित्व कायदा १९६० अन्वये या जागेची नोंद "महाराष्ट्र राज्यातील संरक्षित स्मारकांची यादी" मध्ये संरक्षित स्मारक म्हणून आहे.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Shivleni - Jogai Mandir Cave Temple, Ambajogi". 23 Jan 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत