Jump to content

शिवमहिम्न स्तोत्र

भगवान शंकर

श्री शिव महिम्न स्तोत्र हे भगवान शंकराचे एक प्रमुख स्तोत्र आहे. हे स्तोत्र मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे. पुष्पदंत नावाच्या एका गंधर्वाने हे स्तोत्र रचल्याची आख्यायिका आहे. या स्तोत्रामध्ये एकूण ४३ श्लोक आहेत. त्यापैकी ३१ श्लोक शिवस्तुती असून पुढील फलश्रुती आहे.

आख्यायिका

पुष्पदंत नावाचा गंधर्व प्रतिदिन एका राजाच्या बागेतून फुले चोरून नेत होता. राजाला चोराचा पत्ता लागत नव्हता म्हणून त्याला वाटले कि कोणीतरी गुप्त शक्ती असणारा चोर असावा. तो राजा हा शिवभक्त होता. चोराची शक्ती नाश पावावी म्हणून राजाने बागेमध्ये शिवनिर्माल्य टाकला. तेव्हा त्या निर्माल्याचे उल्लंघन झाल्याने पुष्पदंतची शक्ति नाश पावली. तेव्हा त्याच्या लक्षात आल्यावर त्याने शंकराच्या कृपेकरिता हे स्तोत्र रचले. या कथेचा श्लोक ३७ मध्ये उल्लेख आहे.