Jump to content

शिल्पा प्रभाकर सतीश

शिल्पा प्रभाकर सतीश या आय.ए.एस. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. तिरुनेलवेली जिल्ह्याच्या त्या २१५व्या कलेक्टर आणि पहिल्या महिला कलेक्टर आहेत. त्यांनी मे २०१८ मध्ये त्यांच्या कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. भारतातील ग्रामीण बालसंगोपन केंद्र असलेल्या अंगणवाडीसाठी आणि लोकांसमोर एक आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या ३ वर्षाच्या मुलीला अंगणवाडीत दाखल केले. या वर्तनाचे संपूर्ण भारतभर लोकांनी स्वागत केले.[][][][][]

प्रारंभिक जीवन

शिल्पा प्रभाकर सतीश यांचा जन्म ३० ऑगस्ट १९८१ रोजी कर्नाटकात झाला. त्यांनी बंगळुरू विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी अखिल भारतीय युपी.एस.सी. (संघ लोकसेवा आयोग) परीक्षेत ४६ वा क्रमांक पटकावला.

नागरी सेवक म्हणून कारकीर्द

  • २०१० मध्ये त्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी होत्या
  • २०११ ते २०१४ दरम्यान वेल्लोर जिल्ह्याच्या तिरुपत्तूर उपविभागासाठी उपजिल्हाधिकारी
  • चेन्नई कॉर्पोरेशनमध्ये एक वर्षासाठी उपायुक्त (शिक्षण).
  • चेन्नईच्या उद्योग विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष उद्योग मार्गदर्शन आणि निर्यात प्रोत्साहन ब्युरो
  • मे २०१८ पासून थिरुनेलवेलीचे जिल्हाधिकारी https://tirunelveli.nic.in/collector-profile/

पुरस्कार

  • २०१९ मध्ये शिल्पा प्रभाकर सतीश यांना गुरुवारी चेन्नई येथे मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांच्याकडून तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाचा 'प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष पुरस्कार' मिळाला.[]
  • २०१९ मध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड मिळाला[]

संदर्भ

  1. ^ "Tirunelveli Collector Sets Precedent by Sending Daughter to Anganwadi Centre". News18 (9 January 2019).
  2. ^ "Tamil Nadu Collector Puts Daughter In Anganwadi, Not Private School". NDTV.com (9 January 2019).
  3. ^ Prabhakar satish, Shilpa. "Tirunelveli collector skips Private school". www.thenewsminute.com (9 January 2019).
  4. ^ Karthikeyan, S. "Tamil Nadu collector wins hearts after choosing state-run Anganwadi centre over private school for daughter". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत) (10 January 2019).
  5. ^ "Water tank: Tirunelveli collector climbs atop water tank to check cleanliness". The Times of India (इंग्रजी भाषेत) (25 August 2018).
  6. ^ "Collector receives award". The Hindu (इंग्रजी भाषेत). 13 June 2019.
  7. ^ "Tirunelveli district admin bags digital transformation award 2019". The Times of India (इंग्रजी भाषेत) (7 November 2019).