शिल्पा कांबळे
शिल्पा कांबळे | |
---|---|
जन्म नाव | शिल्पा अदिनाथ कांबळे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखन, नोकरी: आयकर अधिकारी |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी |
विषय | सामाजिक, आंबेडकरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | निळ्या डोळ्यांची मुलगी |
प्रभाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
वडील | अदिनाथ किसन कांबळे |
आई | लक्ष्मी अदिनाथ कांबळे |
पती | प्रवीण भोरे |
अपत्ये | साहीर प्रवीण भोरे (मुलगा) |
पुरस्कार | मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (२०१९) |
शिल्पा कांबळे या भारतीय स्त्रीवादी व आंबेडकरवादी मराठी भाषेतील लेखिका आहेत. त्यांनी निळ्या डोळ्यांची मुलगी ही कादंबरी लिहिलेली आहे.[१] तसेच त्यांनी भारतात गोमांसावर झालेल्या बंदीनंतर बिर्याणी नावाचे नाटक बनवले ज्यात एक मुसलमान आणि एक दलित अशा दोन स्त्रियांची कथा आहे.
सुरुवातीचे जीवन व शिक्षण
शिल्पा कांबळे या मुंबई येथील निवासी आहेत. त्यांचे मूळ गाव डाकू निमगाव (ता. कर्जत जि. अहमदनगर) येथील तसेच आजोळ मैदान मातकुळी (ता. आष्टी जि. बीड) हे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण विक्रोळी मुंबई येथील महानगरपालिका शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण विकास हायस्कूल येथून तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया कॉलेजमधून झाले असून सांख्यिकी विषयात त्या बी.एस्सी. आहेत.
कारकीर्द
कांबळे सेंट्रल गव्हर्मेंट स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयकर विभागात आयकर अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Amazon.in: Shilpa Kamble: Books". www.amazon.in. 2018-06-02 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- लेखिका शिल्पा कांबळे Archived 2018-06-02 at the Wayback Machine.
- मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे[permanent dead link]
- 'आंबेडकर जयंतीवरून वाद झाला आणि आम्हाला एकप्रकारे वाळीत टाकलं गेलं'