शिराळा तालुका
शिराळा तालुका शिराळा तालुका | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | सांगली जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | वाळवा उपविभाग |
मुख्यालय | शिराळा |
लोकसंख्या | १,४६,८८४ (२००१) |
शहरी लोकसंख्या | ७,४२४ |
तहसीलदार | विजया जाधव |
लोकसभा मतदारसंघ | हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | शिराळा विधानसभा मतदारसंघ |
शिराळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. शिराळा हे तालुक्याचे मुख्यालय कधीकधी बत्तीस शिराळा या नावाने ओळखले जाते.
स्थान
शिराळा गाव हे सांगलीपासून ६० किमी अंतरावर आहे तर मुंबईपासून ३५० किमी अंतरावर आहे. कोल्हापूर पासून ५३ कि.मी. आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पेठ नाक्यापासून १५ कि.मी. अंतरावर आहे.
भौगोलिक माहिती
शिराळा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस[१] असणारा प्रदेश आहे. शिराळा गावाची लोकसंख्या एकूण २८,००० आहे. तालुक्याच्या शेवटी चांदोली अभयारण्य आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीने बांधलेले धरण म्हणून चांदोली धरण ओळखले जाते. या धरणाला लाभलेले निसर्गाचे देणे असे आहे कि हे धरण बांधल्यापासून एकदाही रिकामे झाले नाही नेहमी पावसाळ्यात हे धरण १००% भरतेच इतका प्रचंड पाऊस या धरण परिसरात होतो. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २७ टी. एम. सी. आहे या धरणाला 'वसंत सागर' असे नाव आहे. या धरणातून वारणा नदी येते. या नदीमुळे वारणाकाठचा प्रदेशाला बारमाही पाणी मिळाले आहे. जंगलाच्या शेवटी प्रचीतीगड नावाचा किल्ला आहे. या किल्ल्यावर प्रचीती देवीचे मंदिर आहे म्हणून या किल्ल्याला प्रचीतीगड हे नाव पडले. त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या राज्याचे कारागृह होते येथे कडेलोटाच्या शिक्षेसाठी गुन्हेगारांना आणले जात. या किल्ल्याच्या पायथ्याशी शृंगारपुर आहे म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची सासुरवाडी तसेच महाराणी सईबाई यांचे माहेर...
शिराळा तालुक्याला रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या ४ जिल्ह्यांच्या सीमा आहेत...
बत्तीस शिराळा नावाचा उगम
पहिलं गावचे नाव श्रीयालय असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील ३२ खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता, म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले.
ऐतिहासिक महत्त्व
शिराळ्याचा उल्लेख इ.स .९०० च्या पूर्वीपासून आढळतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेताना त्यांना सोडवण्याचा प्रयत्न फक्त शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर झाला. त्याचे नेतृत्व किल्लेदार पिलाजी देशमुख आणि दीक्षित यांनी केले होते पण त्यामध्ये ते अपयशी झाले. शिराळा तालुक्यात प्रमुख दोन किल्ले शिराळा आणि प्रचीतीगड. शिराळा गावामध्ये गोरक्षनाथांचे प्राचीन मंदिर आहे. आख्यायिका अशी सांगितली जाते कि गोरक्षनाथ भिक्षा मागत गावामधून जात असताना ते गावातील महाजन यांच्या घरी गेले असता तिथे त्यांनी पहिले कि त्यांच्या घरी नागाच्या प्रतिमेची पूजा चालू होती, तेव्हा नाथानी त्यांना प्रश्न केला " जर जिवंत नाग पाहिलास तर त्याची अशीच मनोभावे पूजा करणार का?", त्यावर त्या महिलेनी "हो" म्हणून सांगितले आणि पाहतात तर खरोखर त्यांच्या घरी जिवंत नाग खेळत होते. त्यावेळी तेथे कोतवाल घरातील शेतकरी होते त्यांनी प्रत्येक वर्षी नाग पकडून पूजेला नागपंचमी दिवशी घेऊन येतील असे सांगितले तेव्हापासून अखंड अशा स्वरूपात जिवंत नागाची पूजा शिराळा गावामध्ये केली जाते...
वैशिष्ट्य
हे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे[२] जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे. शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
तालुक्यातील प्रमुख गावे
मणदूर | करुंगली | कोकरुड | मांगरुळ | सांगाव | अंत्री बुद्रुक |
शिराळा | पवारवाडी | मांगले | पाडळीवाडी | नाटोली | |
नाथ(गोरक्षनाथ मंदिर) | चिखलवाडी | बिऊर | कांदे | मोरेवाडी | |
जांभळेवाडी | लादेवाडी | फकीरवाडी | भाटशिरगाव | भागाई वाडी | |
खुजगाव | चरण | चांदोली | रिळे फुफिरे |
- अंत्री खुर्द
- अंत्री बुद्रुक
- अस्वलेवाडी
- आंबेवाडी
- आरळा
- इंगरूळ
- उपवळे
- औंढी
- कोंडाईवाडी
- कोकरुड
- कणदुर
- कदमवाडी (शिराळा)
- करमाळे (शिराळा)
- करूंगली
- कांदे
- किनरेवाडी
- कापरी
- काळुंद्रे (शिराळा)
- कुसळेवाडी
- कुसाईवाडी
- खेड (शिराळा)
- खराळे
- खिरवडे
- खुंदलापूर
- खुजगाव
- गवळेवाडी (शिराळा)
- गिरजवडे
- गुढे (शिराळा)
- चरण
- चिंचोली (शिराळा)
- चिंचेवाडी
- चिखलवाडी
- चिखली (शिराळा)
- जांभळेवाडी
- टाकवे (शिराळा)
- सोनवडे
- सांगाव
- सावंतवाडी (शिराळा)
- तडवळे (शिराळा)
- धसवाडी
- ढोलेवाडी
- देववाडी
- निगडी (शिराळा)
- नाटोली
- नाठवडे
- धामवडे
- प. त. शिराळा
- प. त. वारुण
- फकिरवाडी
- भटवाडी (शिराळा)
- बेरडेवाडी
- भैरेवाडी
- बेलेवाडी
- बेलदारवाडी
- बांबवडे
- बिऊर
- पाचगणी (शिराळा)
- पाचुंब्री
- भाटशिरगाव
- पाडळेवाडी
- पाडळी (शिराळा)
- भाष्टेवाडी
- पावलेवाडी
- बिळाशी
- पुनवत (शिराळा)
- फुफिरे
- रेड
- येसलेवाडी
- मेणी
- मणदूर
- मोरेवाडी (शिराळा)
- मोहरे
- येळापूर
- मराठेवाडी (शिराळा)
- मांगरूळ (शिराळा)
- मांगले
- रांजणवाडी (शिराळा)
- मानकरवाडी
- मानेवाडी (शिराळा)
- मादळगांव
- रिळे
- माळेवाडी (शिराळा)
- लादेवाडी
- शिंदेवाडी (शिराळा)
- वाकूर्डे खु.
- वाकूर्डे बु.
- वाडीभांगाई
- हात्तेगाव
- शिरसटवाडी
- शिरशी (शिराळा)
- शिराळे खुर्द
- शिराळा
- शिवणी (शिराळा)
- शिवरवाडी
संदर्भ
- ^ जागतिक पर्जन्यमान आलेख दर्शविणार्या संकेतस्थळावरून
- ^ ३२ शिराळा या संकेतस्थळावरून साभार[permanent dead link]
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका |