Jump to content

शिराळा

शिराळा
जिल्हासांगली जिल्हा
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्या(शहर) २८,६७९
(२००१)
दूरध्वनी संकेतांक०२३४५
टपाल संकेतांक४१५-४०८
वाहन संकेतांकMH-10
संकेतस्थळhttp://www.sangli.nic.in


शिराळा हे शहर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या शहराला बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते.

स्थान

शिराळा हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (नवीन नंबर ४८)वरील वाघवाडी, इटकरे फाटा व पेठ नाक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे; तसेच (कोठून?) ३५० किलोमीटरवर, सांगलीपासून ६० किलोमीटरवर आणि कोल्हापूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.

भौगोलिक

शिराळा हे डोंगराळ भागात असून शहराची रचनाही चढ‍-उताराची आहे. या शहराचे हवामान मुसळधार पाऊस, थंड आणि गुलाबी हिवाळा असे आहे. शहराला मोरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहराच्या मध्य भागातून एक ओढा जातो, त्याचा व बाहेरून येणाऱ्या मोरणा नदीचा संगम गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ झाला आहे.

धार्मिक

वैशिष्ट्य

हे शहर नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकऱ्यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या परंपरेमुळे जगभर प्रसिद्ध आहे. या शहर समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले ११ मारुतीचे मंदिरही आहे. महाराष्ट्र शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

नाग मंदिर शिराळा येथील मूर्ती
नाग मंदिर शिराळा येथील मूर्ती

मंदिरे

  • गणपती मंदिर
  • नाग मंदिर
  • गुरुदेव दत्त मंदिर
  • गोरक्षनाथ मंदिर
  • ग्रामदैवत अंबामाता मंदिर
  • नृसिंह मंदिर
  • महादेव मंदिर
  • मारुती मंदिर (समर्थ रामदासांनी स्थापलेले)
  • राम मंदिर
  • लक्ष्मी नारायण मंदिर
  • विठ्ठल रुक्मिणी मंदिर
  • शनिदेव मंदिर

ऐतिहासिक

शिराळा या शहराला फार मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथे असणारा भुईकोट किल्ला. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोराक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या शहरात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या शहराला पडलेले नाव म्हणजेच 'बत्तीस शिराळा'... छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा शहराच्या देशमुख (इनामदार) आणि किल्ल्याचे व शहराचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.

शिराळ्यामध्ये वर्षाकाठी महत्त्वाच्या २ यात्रा भरतात, एक नागपंचमीची आणि दुसरी गोरक्षनाथांची. तसेच १२ वर्षातून एकदा महायात्रा भरते. उत्तरेतून कुंभ मेळ्यातील सगळे साधू नाथांच्या दर्शनाला येतात तेव्हा ही खूप मोठी यात्रा भरते. शिवाय प्रत्येक एकादशीला एक छोटी यात्रा भरते.

शहरातील आडनावे

अनगळ, आत्तार, आंबर्डेकर, आलेकर, आवटे, इंगवले, इनामदार, उजगरे, उबाळे, ओसवाल, कदम, कनोजे, कबाडे, काकडे, काझी, कानकात्रे, कांबळे, कार्वेकर, काशीद, कासार, काळे, कुंभार, कुरणे, कुऱ्हाडे, कुलकर्णी, कोतवाल, कोळी, कोळेकर, खबाले, खिंवसरा, खुर्द, गरगटे, गाढवे, गांधी, गायकवाड, गोसावी, घाडगे, घाशी, घोडे, चव्हाण, चिकुर्डेकर, चित्तूरकर, जाधव, जोशी, टिळे, ठोके, डांगे, तेली, त्रिपाठी, थोरबोले, थोरात,दिलवाले, दिवटे, दिवाण, दुबुले, देशपांडे, देशमाने, देशमुख, देसाई, धस, धुमाळ, नदाफ, नलवडे, नलावडे, नवांगुळ, नाईक, नांगरे, निकम, पटेल, पठाण, परदेशी, परीट, पवळ, पवार, पाटील, पारेख, पिरजादे, पोटे, बांदल, बांदिवडेकर, बिचकर, बिळासकर, भालेकर, भोगावकर, भोसले, मोरे (सरकार),मणेर, महाजन, महिंद, माळी, मिरजकर, मिरासदार, मुजावर, मुंडे, मुल्ला, मुळे, मोमीन, यादव, रसाळ, रोकडे (लोहार गल्ली), लोहार, वडार, विभूते, शहा, शिंदे, शिंदे सरकार, शेख, शेटे, शेणवी (बायपास रोड), शेणेकर, शेळके, सय्यद, सरकाळे, सवाईराम, सातपुते, सावंत, साळवी, सुतार, सुरले, सुर्वे, सूर्यवंशी, सोनटक्के, हसबनीस, हिरवाडेकर, जंगम,पोवेकर, इ., सयाजी ईश्वर कांबळे. तडाखे.

औद्योगिक

शहरातील MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रियल ॲन्ड डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन)मध्ये छोटेछोटे औद्योगिक कारखाने आहेत.. हा 'D' zone MIDC असल्यामुळे येथे अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येथील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इथे प्रामुख्याने गारमेंट उद्योग, दूधसंघ, धान्यापासून मद्य निर्मिती, कार्बन उद्योग, bio fuel , अशा क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या असून अजूनही कंपन्या येत आहेत. 'विराज अल्कोहोल' ही येथील एक मोठी कंपनी असून इथेही बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला आहे.

संदर्भ