शिरसाळा मारोती मंदिर
?श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर,शिरसाळा ता बोदवड महाराष्ट्र • भारत | |
— मंदिर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • २९६ मी |
जवळचे शहर | बोदवड,मुक्ताईनगर |
जिल्हा | जळगाव |
भाषा | मराठी |
शिरसाळा मारोती शिरसाळा गावचे एक मारुती मंदिर आहे आणि जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात आहे[१]
इथे दर शनिवारी, मंगळवारी भाविकांची गर्दी असते. भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात तसेच मारुतीच्या जन्मदिनी इथे भाविक खूप मोठ्या संख्येने येतात.
इतिहास
शिरसाळ्याचा मारोती या नावाने हे मंदिर देवस्थान आजूबाजूच्या गावांमध्ये आणि बोदवड तालुक्यात ओळखले जाते. ह्या मंदिराची अशी अख्याईका आहे की या मंदिरावर जेव्हा जेव्हा कळस बांधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा कळस टिकला नाही असा अनुभव भक्तांकळून आणि शिरसाळ्यातील गावकऱ्यांकडून सांगितला जातो[२][३]
मंदिर
शिरसाळ्याचा मारोती हा स्वयंभु आहे.नवसाला पावनारा मारोती या नावाने भाविकांमध्ये हा बजरंगबली प्रसिद्ध आहे.मंदिर परीसर मोठा आहे.गणपतीचे मंदिर,शनिदेव मंदिर,राम मंदिर आणि महादेव मंदिर येथे आहे.शिरसाळा मारोती जागृत देवस्थान आहे अशी महती आहे[४]शिरसाळ्याचे मारुती मंदिर शिरसाळा गावखजवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे आणि मुक्ताईनगर पासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. जळगाव पासून ७५ किलोमीटर अंतरावर आहे[३]
संदर्भ
- ^ नेटवर्क., लोकमत न्यूझ (२०१९). "बोदवड तालुक्यातील शिरसळा येथे शनीआमावस्यानिमित्त उसळला जनसागर". जळगाव: लोकमत वृततपत्र. pp. १.
- ^ "शिरसाळा मारुतीला तीर्थक्षेत्र दर्जाची प्रतीक्षा". Lokmat. 19 मार्च 2020.
- ^ a b "बलोपासनेसाठी झाली राज्यात मारोती मंदिरांची निर्मिती | eSakal". www.esakal.com.
- ^ वृत्तसेवा, सकाळ (२०२०). "कौलदेणारा शिरसाळ्याचा मारोती". जळगाव: सकाळ वृत्तसेवा.