Jump to content

शिरसवडी

  ?शिरसवडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरखटाव
जिल्हासातारा जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

शिरसावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.

हवामान

येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

गावाची ओळख

- असे बोलले जाते की आरएसएसची पहिली ग्रामपंचायत ही खटाव तालुक्यातील शिरसवडी गावची असल्याचे बोलले जाते...तसेच येथे संत लोकांची भूमी आहे पहिल्या वेळेस बर्गे हे येथील सुभेदार होते त्यांनी सिरसाई देवीचे प्राचीन मंदिर त्यांनी बांधले...

ग्राम पंचायत 

[]शिरसवडी ग्रामपंचायतज्यात गावचा प्रशासकीय आणि राजकिय कारभार चालतो आशी गावची ग्रामपंचायत . ग्रामपंचायतीचे स्थान गावाच्या मध्य भागी असुण ओळख म्हणुन शेजारी शिरसवडी गावचे एस टी स्ट्याण्ड आहे या ग्रामपंचायतीची नोंद ग्रामपंचायत रजिष्टर नमुना नंबर अच्या मिळकत क्रमांक: - 254 मध्ये पश्चिम मुखी वरती स्ल्याप लांबीः -50 व रुंदीः -50 त्याची विभागणी एक हॅाल दोन रुम एकात ग्रामसेवक ,सरपंच आणि दुसरीकडे संगनक चालक अशा प्रकारे ग्रामपंचायतीची विभागनी केलेली आहे .

ग्रामपंचायत स्थापना सन -1954

भौगोलिक माहिती

  • जवळचे प्रमुख विमानतळ :-                 कराड
  • जवळचे प्रमुख रेल्वेस्थानक :-                धामणेर
  • जवळचे प्रमुख बसस्थानक :-                वडुज
  • गावातील प्रमुख तीर्थस्थळे / पर्यटन स्थळे :-    शेकुबादादा देवस्तान
  • एकूण क्षेत्र :-                            1178 ( हेक्टर )
  • शेती उपयुक्त क्षेत्र :-                      400 ( हेक्टर )
  • बागायती क्षेत्र :-                          345.67 ( हेक्टर )
  • जिरायती क्षेत्र :-                          720 ( हेक्टर )
  • वन क्षेत्र :-                              14.90 ( हेक्टर )
  • मुख्य पीक :-                            बाजरी, गहु, ज्वारी
  • तलावः-                                 24.51 ( हेक्टर )
  • गावठानः-                               12 ( हेक्टर )
  • रस्ते व मार्गः-                            9.60 ( हेक्टर )
  • कालवे व पाटबंधारेः-                       0.62 ( हेक्टर )

लोकसंख्याशास्त्रीय माहिती

  • जनगणनेचे वर्ष:-                                   2011-2012
  • एकूण लोकसंख्या:-                                2004
  • पुरूष:-                                                1096
  • महिला:-                                              908
  • स्त्री-पुरूष टक्केवारी:-                             82 टक्के
  • अनुसुचीत जाती:-                                   154
  • अनुसुचीत जमाती:-                                0
  • इतर:-                                                 1723
  • जन्मदर:-                                            2.5
  • मुत्युदर:-                                             2.8
  • तेवयोगटातील मुलांमुलीची संख्या:-      123
  • एकूण साक्षरता दर:-                               90 टक्के
  • पुरुष साक्षरता दर:-                                91 टक्के
  • स्त्री साक्षरता दर–                                  89 टक्के

निवडणूक

(माहिती अद्यायावत नाही, अद्यायावत करणे जरुरी आहे)

  • ग्रामपंचायत निवडणूक क्रमांक                                     :-       0148/3
  • मागील निवडणूकीची तारीख                               :-       20/09/2009
  • सध्या कार्यरत असलेली ग्रामपंचायत कार्यकारणी आस्तीत्वात आल्याची तारीख                 :-       20/09/2001
  • मागील निवडणूकी प्रमाणे ग्रामपंचायत आस्तीत्वात येण्याची तारीख                          :-       19/09/2014
  • पुढील निवडणूकीची तारीख                                 :-       19/09/2014
  • ग्रामपंचायत मधील एकूण सदस्य संख्या                  :-       9
  • महिलासाठी आरक्षीत जागा                                  :-       3
  • अनुसुचीत जातीसाठी आरक्षीत जागा                       :-       1
  • नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षीत जागा        :-       3
  • खुल्या प्रवर्गाच्या एकूण जागा                               :-       5
  • शेरा :-

ग्रामपंचायत सरपंच / उपसरपंच कारकीर्द

अ. न.सरपंच नावउपसरपंच नावकारकिर्दीचे वर्ष
1रामचंद्र विनायक फडणीस------1955 ते 1960
2प्रभाकर विनायक फडणीस------1960 ते 1970
3परशुराम बहीरु इंगऴेआनंदा विठोबा इंगऴे1970 ते 1975
4शंकर नामदेव इंगऴेजनार्धन सिताराम इंगऴे1975 ते 1980
5एकनाथ ज्ञानू इंगळेपांडुरंग कृष्णा इंगळे1980 ते 1985
6परशुराम बयाजी इंगळेविष्णू धोंडी इंगळे1985 ते 1990
7चंद्रकांत सिताराम इंगऴेशंकर चांगदेव राणे1990 ते 1994
8आनंदराव विठोबा इंगळेबाबुराव महादेव पाटोळे1994 ते 1999
9अर्जुन गणपत इंगऴेआत्माराम राजाराम इंगऴे1999 ते 2004
10शांताबाई तुकाराम कांबळेदादासो निवृत्ती इंगऴे2004 ते 2009
11अशोक लक्ष्मण मानेमुकुंद जगन्नाथ इंगऴे2009 ते 2014
12??2014 ते ----

शिरसवडी गावातील सामाजिक/धार्मिक परिस्थीती

पुरातनकाळा पासून भारतामध्ये असलेले विविध समाज आणि धर्म ही एक भारताला लाभलेली देनगी आहे .त्यामुळे भारतात वसलेले हे गाव या ही गावात विविध समाज आणि धर्म आहेत.

गावातील समाज

मागील 13 शतकापासून प्रत्येक गावात चार भागात समाज होता 1)ब्राम्हण 2) क्षत्रीय 3) शुद्र 4) वैश्य या स्वरूपाचे चारी समाज या गावात वेगवेगळ्या तऱ्हेने विभागलेला आहे.गावाच्या चारी बाजुस यांची वसाहत बसली आहे. या बरोबर 12 आलुतेदार आणि 12 बलुतेदार आहेत. जे गावाच्या प्रत्येक गरजा पुरवतात.

गावातील धार्मिक परीस्थीती

आपला देश विविध धर्मांमधे आणि जातीमध्ये विभागलेला असल्याने प्रत्येक गावात वेगवेगळे जाती ,धर्म विभागले आहेत. हिंदु, मुस्लिम धर्माचे आणि मराठा, महार , मांग ,चांभार , कुंभार अशा विविध अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमाती हे गाव विभागलेले आहे. प्रामुख्याने मराठा समाज संख्येने जास्त आहे.

गावातील प्रतीष्ठीत देवस्थाने

शेकोबादादा हे गावाचे महत्त्वाचे देवस्थान आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. हे वारकरी संप्रदायातील महान संत, संत शेकोबादादा यांचे समाधी मंदिर आहे. चैत्र कृ. ७/८ला येथे पालखी सोहळा आयोजित केला जातो. उत्सवापूर्वी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पारायण बऱ्याच वर्षांपासून आयोजित केले जात आहे.

त्याच बरोबर भैरवनाथ मंदिर देखील प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानाची यात्रा चैत्र महिन्यात अमावास्येला 2 दिवस भरते. यावेळी रथोत्सव, कुस्त्या तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ही केले जाते.

गावातील हिंदू मराठा समाजाचे कुलदैवत श्री वाजूमाता देवी हे देवस्थान वाजेगाव, ता. पाटण, जि. सातारा येथे वसले आहे. समस्त गावकरी माघ पौर्णिमेला वाजेगाव येथे होण्याऱ्या वार्षिक उत्सवासाठी मुक्कामी जातात.

मुस्लिम समाजाची काही घरे ही गावात आहेत. त्यांच्या प्रार्थनेसाठी मस्जिद सुद्धा गावात उभारली गेली आहे.

वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन कीर्तनाचे आयोजन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच शेकोबादादा मंदिरात नेहमी केले जाते.

तसेच गावात संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून शेकोबादादा मंदिराजवळ सत्संग भवन बांधण्यात आले आहे. येथेही साप्ताहिक सत्संगाचे आयोजन केले जाते. तसेच गावात अधून मधून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

सर्व जाती धर्माचे समस्त गावकरी सर्व उत्सव एकत्र येऊन साजरे करतात व गुण्यागोविंदाने राहतात.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ National Panchayat Portal , http://www.panchayatportals.gov.in/web/189526_shirswadi-village-panchayat