शिरवडे
?शिरवडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सातारा |
तालुका/के | कराड |
लोकसंख्या | २,७३२ (२०११) |
कोड • पिन कोड | • 415115 |
शिरवडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालूक्यात कृष्णा नदी खोऱ्यातील एक गाव आहे.शिरवडे हे मध्य रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.[१]राष्ट्रीय महामार्ग ४- वरील तासवडे टोल नाकापासून २ किलोमीटर अंतरावर गाव आहे. शिरवडे गावा जवळ सह्याद्री साखर कारखाना आहे. गावात जागृत जोतीबा देवस्थान आहे,
राजकीय संरचना
शिरवडे,हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले पंचक्रोशीतील ऐतिहासिक गाव आहे. पूर्वी गावात आठवडे बाजार,गुरांचा खरेदी विक्री बाजार भरत असे.शिरवडे हे उत्तम गावरचना असलेले गाव आहे.गावात मोठे सरळ रस्ते , मोठे चौक, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, ज्योतिर्लिंग विद्यालय,सरकारी दवाखाना, पोस्ट ऑफिस,बॅक तसेच सोसायटीही आहे. गावच्या पश्चिमेला कृष्णा नदी वाहते तसेच पश्चिमेला २ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ४ जातो आणि गावाच्या पूर्वेला मध्य रेल्वेचा लोहमार्ग आहे त्यावर शिरवडे रेल्वे स्थानक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या क्रांतिकारी मित्रांनी शिरवडे रेल्वे स्थानक पेटवून दिले होते अशी ऐतिहासिक नोंद आढळते.तसेच आण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीत शिरवडे रेल्वे स्थानकाची नोंद आहे.गावातुन सातारा शहर सुमारे ४५ किमी तर कराड सुमारे १५ किमी अंतरावर आहे. शिरवडे गावाचं ग्रामदैवत जोतिबा आहे.गावची यात्रा हनुमान जयंतीला असते . शिरवडे गावची भौगोलिक विभागणी तीन भागात होते. शिरवडे (संस्थान),शिरवडे रेल्वे स्थानक आणि शिरवडे (ब्रिटिश).
उद्योग
शिरवडे गावची सर्व जमीन बागायती आहे.शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.सह्याद्री साखार कारखाना गावालागूनच असल्याने कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.तसेच शेतीपूरक व्यवसायातही अग्रेसर आहे.ऊस हे प्रमुख पीक गावात घेतलं जाते तसेच भुईमूग, सोयाबीन,हळद यासारखी हंगामी पिकेही घेतली जातात .
सातारा जिल्ह्यातील तालुके |
---|
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका |