Jump to content

शिदनाक महार

शिदनाक महार हे साताऱ्याजवळील कळंबी गावचे वतनदार होते. औरंगजेबच्या हातून संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली तेव्हा महाराष्ट्रभर बंडाळी माजली त्यात शिदनाक महार यांनी पलटन जमवून मुघलांविरुद्ध काही काळ संघर्ष केला. शाहू महाराज कैदेतून सुटुन पुन्हा राज्यात आले तेव्हा यांची निष्ठा शाहू राजांना सामिल झाली. यात शाहू महाराजांनी यांना कळंबी गाव इनाम दिला. १७९५ - १८१८ या काळात यांचा नातू शिदनाक होऊन गेला. तो खर्ड्याच्या लढाईत होता. छावणित याच्या तंबू भोवती ब्राम्हण, सरदार यांचे तंबू होते. त्यांनी विनंती केली केली की महाराचा तंबू दूर करावा. सरदार पाटणकरांनी परस्पर उत्तर दिले की, ही जेवणाची पंगत नाही. ही शुर-विरांची पंगत आहे. यात जातिपातीचा विचार नाही. महाराचा तंबू हलवण्याची गरज नाही. निकराच्या हल्ल्याच्या दिवशी महाराने पेशव्यास हात जोडून विनंती केली की, मी महार आहे म्हणून सारे माझा तिरस्कार करतात, आज मी काय कामगिरी करतो ती उघड्या डोळ्यांनी पहावी. त्या लढाईत त्याने तलवार गाजवली. पटवर्धन मंडळी खुश झाली. इनाम दिले. पेशवाई बुडाल्यावर हा बराच वर्षे होता. चिंतामणराव पटवर्धन आजारी असता हा त्याच्या समाचारास गेला तेव्हा मोठा समारंभ करून सऱ्यांना त्याची हयात ओळख पटवर्धनानी करून दिली.