Jump to content

शितला देवी

शितला देवी

शितला देवी
वाहनगाढव
शस्त्रझाडू, सुपली, शितल जल असलेले भांडे
पतीशिव
अन्य नावे/ नामांतरेपोचम्मा
या अवताराची मुख्य देवतापार्वती
नामोल्लेखस्कंदपुराण

शितला देवी ही हिंदू धर्मातील एक देवता असून या देवीला आई भगवतीचे रूप म्हणून ओळखले जाते. जवळपास भारतभर या देवीची उपासना करताना दिसून येते.[]

स्कंदपुराणानुसार जेव्हा देवतांनी भगवतीच्या आराधानेसाठी अग्नी प्रज्वलित केला, तेव्हा त्यातून शितला देवी प्रकट झाली. या देवीचे वाहन गाढव असून एका हातात चांदीचा झाडू आणि दुसऱ्या हातात शीतल जल असलेले भांडे दिसून येते. ही देवी विविध प्रकारचे ज्वर, गोवर आणि कांजण्या यांचा नाश करणारी देवता आहे अशी मान्यता आहे.[]

शितला देवीचा मंत्र:-

वन्देऽहंशीतलांदेवीं रासभस्थांदिगम्बराम्।

मार्जनीकलशोपेतां सूर्पालंकृतमस्तकाम्॥

बौद्ध धर्मानुसार, शितला देवी आणि ज्वरासुर नावाचा राक्षस हे पार्णशबरी देवीचे सोबती आहेत. पार्णशबरी ही बौद्ध धर्मातील आजार निर्माण करणारी देवता आहे, आणि तिच्या दोन बाजूला शितला देवी आणि ज्वरासुर नावाचा राक्षस उभे असतात.[]

काही उल्लेखनीय मंदिरे

जौनपूर उत्तर प्रदेश येथील शितला देवी
  1. शितला देवी मंदिर, माहीम
  2. शितला देवी मंदिर, बारड, महाराष्ट्र.
  3. शितला माता जन्मस्थान मगध, बिहार शरीफ , नालंदा
  4. शितला माता मंदिर, मैनपुरी , उत्तर प्रदेश
  5. शितला माता मंदिर, मेरठ , उत्तर प्रदेश
  6. शितला चौकीया धाम मंदिर, जौनपूर
  7. शितला माता मंदिर, खंडा, सोनीपत
  8. मां शितला मकरा धाम, जौनपूर
  9. श्री शितला माता मंदिर, आदळपुरा, मिर्जापूर , उत्तर प्रदेश
  10. शितला माता मंदिर, जलोर , राजस्थान
  11. शितला माता मंदिर, रींगस , राजस्थान
  12. शितला माता मंदिर, गारिया , कोलकाता
  13. शितला माता मंदिर, उना, हिमाचल प्रदेश
  14. शितला माता मंदिर, पालमपूर, हिमाचल प्रदेश
  15. शितला माता मंदिर, जोधपूर, राजस्थान
  16. शितला माता मंदिर, कौशांभी, उत्तर प्रदेश
  17. शितला माता मंदिर, निजामबाद,
  18. शितला माता मंदिर, बाडमेर, राजस्थान
  19. शितला माता मंदिर, बिधलन, सोनीपत
  20. शितला देवी मंदिर, गुडगाव
  21. शितलादेवी मंदिर, केळवे
  22. शितला देवी मंदिर , सिन्नर , महाराष्ट्र

संदर्भ

  1. ^ Folk Religion: Change and Continuity Author Harvinder Singh Bhatti Publisher Rawat Publications, 2000 Original from Indiana University Digitized 18 Jun 2009 आयएसबीएन 8170336082, 9788170336082
  2. ^ "कौन है माता शीतला, क्यों किया जाता है पूजन? पढ़ें पौराणिक मंत्र" (हिंदी भाषेत). १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Mishra, P. K (1999). Studies in Hindu and Buddhist art By P. K. Mishra. ISBN 9788170173687.