Jump to content

शिक्षणाची प्रयोगशाळा

'[[विज्ञान आश्रम]]' या संस्थेची स्थापना डॉ.श्रीनाथ कलबाग यांनी १९८३ या साली केली.पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेचे ते स्वायत्त केंद्र आहे.आपल्या सभोवतालची सेवा देणारी अनेक जण उदा.गवंडी ,शेतकरी,गाड्या दुरुस्त करणारे तंत्रज्ञ,विक्रेते,इ.अनुभवाच्या शाळेत शिकलेले असतात.त्यांनी कुठल्याही औपचारिक शाळेत शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्याकडे अनेक कौशल्य असतात;त्यांना गणित-व्यवहार अतिशय चांगला येत असतो.

         ते सर्व जण प्रत्यक्ष 'काम करत शिकलेले'असतात.विमानाचा शोध लावणारे राईट ब्रदर,एडिसन,बिलगेट असे अनेक संशोधक व यशस्वी उद्योजकांनी ज्ञान हे केवळ पुस्तकी शिक्षणाने मिळविले नव्हते तर प्रत्यक्ष अनुभवातून मिळविले होते.'हाताने काम करत शिकणे'हि शिक्षणाची नैसर्गिक पद्धत आहे हा डॉ.कालबागांचा विश्वास होता.लहान मुल हे वयाच्या दुसऱ्या वर्षी असेच मातृभाषा शिकते.अशा शिक्षणाचे त्यांना ओझे होत नाही.शिक्षणाची ही नैसर्गिक पद्धत इतकी परिणामकारक आहे कि ती शाळेत न गेलेल्यांना पण सहज शिकता येते.प्रत्यक्ष नेहमीच्या शिक्षणात ही 'हाताने काम करत शिकणे'ची पद्धती रुजवण्यासाठी विज्ञान आश्रम काम करते.

उद्योगी तरुणांसाठी 'ग्रामीण तंत्रज्ञान पदविका 'अभ्यासक्रम हा एक वर्षाचा अभ्यासक्रम विज्ञान आश्रमात राहून मुले करतात.८ पर्यंत शिक्षण झालेला व प्रत्यक्ष हाताने काम करून शिकण्याची तयारी असलेला कोणीही हा अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.पुस्तकी शिक्षणात रस नसलेल्या पण धडपड करणाऱ्या असे हजारो विद्यार्थी यशस्वी उद्योजक झाले आहेत.

शाळा- ग्रामविकासाच केंद्र विकासाची गती वाढवायची असेल तर त्यासाठी तंत्रज्ञान वापरले पाहिजे आणि ते तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेण्यासाठी शाळा हे सर्वात चांगले मध्यम आहे.पाठ्यपुस्तकाचे शिक्षण पद्धतीने पुस्तकी अभ्यासात गती नसलेली विद्यार्धी पण संशोधक/उद्योजक बनू शकतात.मग हीच पद्धत नेहमीच्या औपचारिक शिक्षणात आली तर शिक्षण कितीतरी परिणामकारक होईल? त्यातून नेहमीच्या औपचारिक शाळांमधून इ.८ वी ते १० वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वरील तत्त्वाच्या आधारे मुलभूत तंत्रज्ञाची ओळख आखणी केली जाते.कार्यनुभव शिक्षण महत्त्वाचे आहे